AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकरावीच्या प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसात निर्णय, मुख्यमंत्री महाधिवक्त्यांशी चर्चा करणार : वर्षा गायकवाड

त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (Education Minister Varsha Gaikwad on FYJC admission)

अकरावीच्या प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसात निर्णय, मुख्यमंत्री महाधिवक्त्यांशी चर्चा करणार : वर्षा गायकवाड
| Updated on: Nov 02, 2020 | 1:30 PM
Share

मुंबई : राज्यातील अकरावीच्या रखडलेल्या प्रवेश प्रश्नाबाबत येत्या एक-दोन दिवसात निर्णय होईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (Education Minister Varsha Gaikwad on FYJC admission)

“राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नयेत यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे. घरी असलेल्या अनेक विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन क्लासेसद्वारे सुरु करण्यात आला आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाहीत, त्यांना या कोचिंग क्लासेस लाभ घेता येईल,” अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.

“राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रवेश झाले आहेत. मुलं घरी आहेत, त्यांचा अभ्यास सुरू व्हावा म्हणून ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. पण ज्यांचे प्रवेश झाले नाहीत त्यांनी या क्लासेसचा लाभ घेता येईल,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

“यंदा दहावीच्या परीक्षेत 18 लाख विद्यार्थी पास झाले आहेत. त्यातील 11 लाख विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश दिला आहे. उर्वरित सात लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश लवकरच सुरु होतील,” असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

कोचिंग क्लासेसच्या शिष्टमंडळाची राज ठाकरेंशी चर्चा 

दरम्यान नुकतंच  पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. यावेळी राज ठाकरे यांनी कोचिंग क्लास चालक आणि पालकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं निवेदनही स्वीकारलं. या मागण्या सरकार दरबारी मांडा, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे मांडली.

त्यानंतर थेट पालकांसमोरच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावून अकरावी प्रवेशाची समस्या मांडली. यावेळी आज संध्याकाळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आमची चर्चा आज संध्याकाळी होणार आहे. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला त्याबाबतची माहिती देते, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यावर राज यांनी अकरावी प्रवेशाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असं गायकवाड यांना सांगितलं. (Education Minister Varsha Gaikwad on FYJC admission)

संबंधित बातम्या : 

आधी कोचिंग क्लासेसच्या शिष्टमंडळाशी बैठक, नंतर राज ठाकरेंचा थेट वर्षा गायकवाड यांना फोन

“माणुसकीचा फ्रीज”, घरातील अतिरिक्त खाद्य द्या, भुकेल्यांनी घेऊन जा, मनसेचा अभिनव उपक्रम

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...