Eknath Khadse : माझ्यामागे कितीही चौकश्या लावा, राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणारच; नाथाभाऊंनी भाजपला ठणकावलं

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. या प्रसंगी जनतेशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी भाजपला ठणकावलं. एकेकाळी काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता.

Eknath Khadse : माझ्यामागे कितीही चौकश्या लावा, राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणारच; नाथाभाऊंनी भाजपला ठणकावलं
माझ्यामागे कितीही चौकश्या लावा, राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणारच; नाथाभाऊंनी भाजपला ठणकावलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 4:07 PM

जळगाव: माझ्या मागे सर्व यंत्रणा लावल्या आहेत. मिळेल ती चौकशी करत आहेत. प्रचंड छळवणूक केली जात आहे. तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार, असे ठणकावून सांगतानाच हे सगळे बदनाम करण्याचे कारस्थान आहे. आम्ही त्याला भीक घालत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी भाजपला (bjp) खडसावले. या भागात आमदार निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारीला लागायला हवे. संघटनेचा पाया मजबूत करायला हवा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता हस्तगत करायला हवी. तेव्हा आपल्याला लोकहिताचे काम करून आपले आमदार निवडून आणू शकतो, असं सांगतानाच खडसे यांनी यावेळी ‘एक बूथ, तीस युथ’चा नाराही दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसची जळगावमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. या प्रसंगी जनतेशी संवाद साधताना एकनाथ खडसे यांनी भाजपला ठणकावलं. एकेकाळी काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता. काँग्रेस लोकांच्या संपर्कात गेली आणि सर्व वातावरण ढवळून निघाले. आपल्यालाही तेच करावे लागेल. लोकांशी एकरूप व्हायला हवे. मतदारांच्या दरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा. ‘एक बूथ तीस युथ’ सारख्या संकल्पना राबवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा आणि त्यांना आपल्या पक्षाचा सदस्य बनवून घ्या. सर्वसमावेशक कार्यकारिणी तयार करा, असं आवाहन एकनाथ खडसे यांनी केलं.

तर लोकं तुमच्यामागे उभे राहतील

या जिल्ह्यात राष्ट्रवादी एकटी आहे. आपल्या विरोधात सर्व विरोधक आहेत. पण आपण पुरून उरणार असल्याचे स्पष्ट करतानाच शरद पवार आजतागायत लढत आहेत. अहंपणा विसरून जर आपण काम केले तर निश्चित लोकं तुमच्या मागे उभा राहणार आहेत, असेही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटलांचं कौतुक

प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जयंत पाटील हे ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. पदाधिकारी जर असा कर्तव्यदक्ष राहिला तर नक्कीच आपली संघटना एका विशेष टप्प्यावर येईल अशा शब्दात जयंत पाटील यांचे विशेष कौतुक एकनाथ खडसे यांनी केले.

राष्ट्रवादीला मोठी संधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ, असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न जाणून घ्या, क्रियाशील कार्यकर्ते आपल्या भागात तयार करा, आपापसातील वाद बंद करा आणि आपली संघटना मजबूत करा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.