AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंच्या त्या बॅनरवरुन ‘भावी मुख्यमंत्री’ हटवलं! उलट सुलट चर्चेनंतर शिवसैनिकांचं पाऊल

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचा मोठं स्थान आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र, शिंदे यांनी कार्यकर्त्यांना फोन करुन तो उल्लेख काढायला लावला आहे. शिंदे यांच्यावरील प्रेमापोटीच आपण हा बॅनर लावला असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदेंच्या त्या बॅनरवरुन 'भावी मुख्यमंत्री' हटवलं! उलट सुलट चर्चेनंतर शिवसैनिकांचं पाऊल
एकनाथ शिंदे बॅनर
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 9:42 PM
Share

ठाणे : राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आलं आणि मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विराजमान झाले. त्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होतं. आता एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात भावी मुख्यमंत्री लिहिलेले बॅनर लावले आहेत. शिंदे यांचा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वागळे इस्टेटमधील चेकनाका येथे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यावर शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, आता या बॅनरवरुन भावी मुख्यमंत्री असा उल्लेख काढण्यात आला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचा मोठं स्थान आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आल्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र, शिंदे यांनी कार्यकर्त्यांना फोन करुन तो उल्लेख काढायला लावला आहे. शिंदे यांच्यावरील प्रेमापोटीच आपण हा बॅनर लावला असल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं. शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आल्यामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, आम्ही शिस्तबद्ध शिवसैनिक आहोत. एकनाथ शिंदे यांच्या बद्दल असलेली भावना बॅनरमधून व्यक्त करण्यात आली होती. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख काढण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलं.

वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

येत्या 9 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. तर 4 फेब्रुवारी रोजी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस झाला. दोघा पितापुत्रांना शुभेच्छा देणाऱ्या ठाण्यातील पोस्टर्सही सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. वागळे इस्टेट लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय यादव यांनी एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री, अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. संध्याकाळपर्यंत यावर एकनाथ शिंदे यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यामुळे बराच वेळ या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख पाहायला मिळत होता.

Eknath Shinde Banner

एकनाथ शिंदे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

सरकारस्थापनेवेळी एकनाथ शिंदेंचं नाव चर्चेत

एकनाथ शिंदे हे सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहे. आपल्या मतदारसंघात त्यांची लोकप्रियता मोठी आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी मुख्यमंत्री कोण होणार, अशी जेव्हा चर्चा सुरु झाली होती, तेव्हा एकनाथ शिंदे यांचं नावही स्पर्धेत घेतलं जातं होतं. आता चक्क त्यांच्या नावाखाली भावी मुख्यमंत्री असं लिहीत कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्यानं नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलं होतं.

इतर बातम्या :

PM Narendra Modi Speech : फुटीरतावादी मानसिकता काँग्रेसच्या DNAमध्येच; मोदींची संसदेत जहरी टीका

Video : “शिवसेना आणि ‘हाता’च्या नादाला लागल्यापासून ‘घड्याळा’ची वेळ चुकतेय!”, जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी, उपस्थितांमध्ये हशा

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.