‘धर्मवीर’मधील राजन विचारेंचा ‘तो’ सीन खोटा; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट

आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यातील राजन विचारे यांच्याबाबतच्या एका सीनबद्दल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. दिघे साहेबांनी सांगूनही विचारेंनी राजीनामा दिला नव्हता, असं ते म्हणाले.

'धर्मवीर'मधील राजन विचारेंचा 'तो' सीन खोटा; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट
Eknath Shinde and Rajan VichareImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 3:07 PM

‘धर्मवीर’ या चित्रपटात राजन विचारे यांच्याबाबत दाखवलेलं सर्व खोटं होतं, असा खुलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. “आनंद दिघे साहेबांनी सांगूनही विचारेंनी सभागृह नेतेपदाचा राजीनामा दिला नव्हता. राजन विचारे हे आनंद दिघेंचे नकली शिष्य आहेत. धर्मवीर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सर्व खरं समोर येईल”, असं ते म्हणाले. ‘धर्मवीर’ या चित्रपटात दाखवलं गेलं होतं की, एकनाथ शिंदे यांच्या मुलांच्या निधनानंतर ते पूर्णपणे खचून जातात. दु:खाच्या सागरात बुडालेल्या शिंदेंना त्यातून बाहेर काढण्यासाठी कामात व्यग्र ठेवणं हाच सर्वोत्तम उपाय समजून आनंद दिघे हे राजन विचारे यांना सभागृह नेतेपदाचा राजीनामा द्यायला सांगतात. तेव्हा राजन विचारे लगेच त्या पदाचा राजीनामा देतात. मात्र चित्रपटात दाखवलेलं हे सर्व खोटं असल्याचा खुलासा आता शिंदेंनी केला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“चित्रपटात दाखवलं होतं की राजन विचारे हे स्वत:हून आले आणि त्यांनी राजीनामा दिला. पण हे सगळं खोटं आहे. दिघे साहेबांनी त्याला राजीनामा द्यायला सांगितला, तेव्हा त्याने तो दिला नव्हता. तो रघुनाथ मोरेंकडे गेला आणि म्हणाला, हे काय चालू आहे? माझं पद काढून घेतायत. मोरे साहेब खूप समजुतदार होते. ते म्हणाले की दिघेंनी काही निर्णय घेतला असेल तर तो जाणीवपूर्वक घेतला असेल. हा निर्णय विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे. तू बिलकुल इथे तिथे काही बोलू नकोस. पण तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला. मला पद नकोच होतं. मी शेवटी साहेबांना सांगितलं की असं करू नका. तेव्हा साहेबांनी त्याला बोलावलं आणि त्यांच्या भाषेत आनंदाश्रमामधील आतल्या खोलीमध्ये समजावलं. हे करायला लागलं. आम्ही सिनेमात जे दाखवलं ते एवढं उलटं आणि एकदम चांगलं दाखवलं. पण तो चांगला नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

राजन ठाकरे यांना ठाकरे गटाने ठाण्यातून उमेदवारी दिली आहे. ठाण्यात नरेश म्हस्के यांचा सामना महाविकास आघाडीच्या राजन विचारे यांच्याशी होणार आहे. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या बंडात राजन विचारे यांनी त्यांना साथ दिली नाही. ते उद्धव ठाकरे गटातच राहिले.

Non Stop LIVE Update
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस
आंदोलन होतं विशाळगडासाठी, टार्गेट झालं गजापूर, नेमका कोणी घातला धुडगूस.
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल
मनोज जरांगेंचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा, आंबेडकरांच्या भूमिकेवरही सवाल.
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?
बहिणीनंतर भाऊही लाडके...शिंदेंकडून नव्या योजना, कोण पात्र अन् अटी काय?.
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?
शिवकालीन वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात दाखल, कधी-कुठे पाहता येणार?.