प्रज्ञा ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस

भोपाळ : लोकसभा निवडणुकीआधी वादग्रस्त विधान केल्यामुळे अनेक बड्या नेत्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली, तर काही जणांवर कारवाईही केली आहे. यामध्ये आता प्रज्ञा ठाकूरलाही निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. टीव्ही 9 भारतवर्ष या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रज्ञा ठाकूर यांनी बाबरी मशिदीवर वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे आयोगाने त्यांना नोटीस पाठवली. टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या …

प्रज्ञा ठाकूरला निवडणूक आयोगाची नोटीस

भोपाळ : लोकसभा निवडणुकीआधी वादग्रस्त विधान केल्यामुळे अनेक बड्या नेत्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली, तर काही जणांवर कारवाईही केली आहे. यामध्ये आता प्रज्ञा ठाकूरलाही निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. टीव्ही 9 भारतवर्ष या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रज्ञा ठाकूर यांनी बाबरी मशिदीवर वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे आयोगाने त्यांना नोटीस पाठवली.

टीव्ही 9 भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत प्रज्ञा ठाकूरने दावा केला होता की, मी बाबरी मशिदीवर चढली होती आणि ती पाडण्यासाठी मदतही केली होती. प्रज्ञाच्या या वादग्रस्त वक्तव्यावर मध्य प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त कांता राव यांनी प्रज्ञाला नोटीस पाठवली. यासोबत आयुक्तांनी सर्व राजकीय नेत्यांना आव्हान केलं की, कुणीही आचारसहिंतेचे उल्लंघन करत वादग्रस्त वक्तव्य केलं, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाऊ शकते.

याआधीही निवडणूक आयोगाने वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांवर कडक कारवाई केली आहे. नुकतेच निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, समाजवादी पक्षाचे नेते आजम खान, भाजपच्या केंद्रीय मंत्री मेनका गांधी आणि बसपा अध्यक्ष मायावती यांच्यावर काही तासांसाठी प्रचार आणि भाषण करण्यास बंदी घातली होती.

संबधित बातम्या : 

अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली

‘भाजपला यापुढे राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा कवडीचाही अधिकार नाही’

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *