महिनाभरात माझं लग्न आहे : उदयनराजे भोसले

सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तुफान फटकेबाजी केली. विशेष म्हणजे, व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना-भाजपचे नेते उपस्थित होते. पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे, असं म्हणत राजेंनी व्यासपीठावर एकच हशा पिकवला. पाटणमधील दौलतनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या …

महिनाभरात माझं लग्न आहे : उदयनराजे भोसले

सातारा : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तुफान फटकेबाजी केली. विशेष म्हणजे, व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना-भाजपचे नेते उपस्थित होते. पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे, असं म्हणत राजेंनी व्यासपीठावर एकच हशा पिकवला.

पाटणमधील दौलतनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदे, उदयनराजे भोसले, मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित होते.

“मला बोलवले नसते तरीही मी या कार्यक्रमाला आलोच असतो. कारण, हा घरचा  कार्यक्रम आहे,” अशी सुरुवात करुन, उजवीकडे फडणवीस आणि डावीकडे एकनाथ शिंदे भाजप-शिवसेना यांच्यामध्ये मी उंदरासारखा बसलो होतो, असं म्हणत उदयनराजेंनी टोला लगावला.

मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी जे निर्णय घेतले ते धाडसी निर्णय आहेत. यापूर्वी असेल निर्णय घेतले गेले नाहीत, असं म्हणत उदयनराजेंनी युती सरकारचं कौतुक केलं. आज लोकनेते म्हणण्यासारखे कमी नेते आहेत. समाजाची जाणीव असणारे आज खूप कमी लोक उरलेत, अशी खंतही व्यकत केली.

महिनाभरात माझं लग्न आहे… काही महिन्यांनी सगळ्यांचंच लग्न आहे, असं म्हणत उदयनराजेंनी एकच हशा पिकवला. हे लग्न म्हणजे काही महिन्यांवर आलेली निवडणूक आहे. लोकसभा-विधानसभा निवडणूक आहे, अक्षता टाका, त्यावेळी संपल्या म्हणू नका, अशा शब्दात त्यांनी आपला लोकसभेचा इरादा स्पष्ट केला.

भाषण संपताच उदयनराजे व्यासपीठावरून निघून गेले. मात्र भाषणासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ कमी असल्याने उदयनराजे वगळता इतर सर्वांची भाषणे कट केली. कारण महाराजांशिवाय आपला कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही, अशा शब्दात फडवीसांकडून उदयनराजेंचे कौतुक करण्यात आलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *