राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नगरसेवक मुनावर पटेल यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. खैरणे येथे राहणाऱ्या रिक्षाचालक सुफियाना शेखचे अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी खैरणे येथील रिक्षा स्टँडवर […]

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात अपहरणाचा गुन्हा
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 3:08 PM

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नगरसेवक मुनावर पटेल यांच्यावर अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. खैरणे येथे राहणाऱ्या रिक्षाचालक सुफियाना शेखचे अपहरण करुन मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी खैरणे येथील रिक्षा स्टँडवर घडली होती. रिक्षाचालक सुफियाना खैरणे रिक्षा स्टँडवर गेला असता त्याला तिथे काही लोकांनी रिक्षा उभी करण्यास विरोध केला. यावर सुफियानाने का म्हणून विचारले असता, त्याला नगरसेवक मुनावर पटेल यांच्या कार्यलयावर नेले आणि मुनावर पटेल तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यामुळे सुफियानाच्या कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली. मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने त्यांनी पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी तात्काळ आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मुनावर पटेल आणि इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुनावर पटेल हे प्रभाग 55 चे नगरसेवक आहेत. या झालेल्या घटनेबाबत मुनावर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याला गुंतवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. यामुळे खैरणे परिसरात सोमवारपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुनावर यांच्या विरोधकांनी सुफियाना शेखच्या कुटुंबाला मदत केल्याची चर्चा विभागात सुरु होती. यामुळे पुन्हा दोन गटात दंगा होण्याची शक्यता असल्याने खैरणे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.