AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोलेंना दणका, खंदे समर्थक भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे यांचा भाजपत प्रवेश

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक मानले जाणारे भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुर्यकांत इलमे यांनी नाना पटोले यांना जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

नाना पटोलेंना दणका, खंदे समर्थक भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे यांचा भाजपत प्रवेश
Suryakant Iilame
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 12:08 AM
Share

भंडारा : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे खंदे समर्थक मानले जाणारे भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष सूर्यकांत इलमे यांनी नाना पटोले यांना जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. (Former Bhandara Municipal Council vice president Suryakant Ilame  resign from congress joins BJP)

गडकरी, फडणवीस यांच्या  उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश

भंडारा नगरपरिषदेचे माजी उपाध्यूक्ष सर्यकांत इलमे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले खंदे समर्थक म्हणून ओळखले जायचे. मात्र, आता त्यांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी गडकरी आणि फडणवीस यांच्यासोबतच भाजपचे महाराष्ट्राचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे आदी नेते उपस्थित होते.

पुण्यात माजी मंत्र्याच्या भावाचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधू व माजी सभापती प्रशांत पाटील यांनी 16 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पुण्यातील या पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा अध्यक्ष प्रदीप ग़ारटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हा पक्ष प्रवेश झाला. प्रशांत पाटील हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर प्रशांत पवार म्हणाले, “राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात जोरदार काम करणार आहे. भाजपचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत आणणार आहे.” आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. तसेच सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकादेखील होणार आहेत. प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून या येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ शकतो.

इतर बातम्या :

चोरट्यांनी ऑनलाईन डाळिंब खरेदीच्या बहाण्याने शेतकऱ्याला फसवण्याचा बेत आखला, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदीचे आदेश, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

‘सहकार खातं दबावासाठी असेल तर हा महाराष्ट्र, इथं दबाव टाकून सत्ताबदल होत नाही’, पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा

(Former Bhandara Municipal Council vice president Suryakant Ilame  resign from congress joins BJP)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.