केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’, इंधनाच्या किमती वाढवून रक्तशोषण, नाना पटोलेंचा घणाघात

आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू आहे. जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे", अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.

केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला ‘जळू’, इंधनाच्या किमती वाढवून रक्तशोषण, नाना पटोलेंचा घणाघात
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष


मुंबई : “केंद्रातील मोदी सरकार सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून फक्त दोन-चार उद्योगपती ‘मित्रों’साठीच काम करत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. आधीच महागाईने जगणे कठीण झाले असताना आज पुन्हा स्वयंपाकाचा गॅस 25 रुपयांनी महाग करुन केंद्र सरकारने जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मोदी सरकार सामान्य जनतेला चिकटलेला जळू आहे. जळूप्रमाणेच नागरिकांचे रक्तशोषण करत आहे”, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. (Nana Patole criticizes Modi government over fuel price hike)

महागाईच्या प्रश्नावरुन मोदी सरकारचा पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला. जानेवारी महिन्यापासून मोदी सरकारने सातत्याने दरवाढ करत गॅस सिलिंडर 190 रुपयांनी महाग केला आहे. युपीए सरकारवेळी 440 रुपये असणारा हाच LPG गॅस आता 900 रुपयांपर्यंत महाग झाला आहे. उज्ज्वला योजनेच्या नावाखालीही गरिबांची थट्टा केली जात आहे. उज्ज्वला योजनेत मोफत गॅसच्या नावाखाली गरिबांचे केरोसिन बंद केले आणि आता गॅस 900 रुपयांपर्यंत महाग केला. एवढा महाग गॅस गरीब, सामान्य जनेतला परवडणारा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य जनेतला वाऱ्यावर सोडून फक्त त्यांच्या मोजक्या उद्योगपती मित्रांचेच हित जोपासत आहेत. गेल्या 8 महिन्यात केंद्र सरकारने 67 वेळा इंधन दरवाढ केली. पेट्रोल 107 रुपये, डिझेल 96 रुपये लिटर झाले आहे. गॅसच्या किंमतीही सातत्याने वाढवून इंधनावरील कररुपाने मोदी सरकारने सात वर्षात तब्बल 25 लाख कोटी रुपयांची नफेखारी केली आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे, असा आरोप पटोले यांनी केलाय.

‘जीवघेणी महागाई आता त्यांना ‘डार्लिंग’ वाटत आहे’

‘केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना महागाईची झळ सामान्य जनतेला पोहचू नये यासाठी इंधन आणि गॅसवर सबसिडीच्या रुपाने मदत दिली जात होती. ज्याचा लाभ जनतेला होत होता, ती मदतही मोदी सरकारने आता पूर्णपणे बंद केली आहे. यूपीए सरकारवेळी ‘महंगाई डायन’ वाटणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता हीच जीवघेणी महागाई ‘डार्लिंग’ वाटत आहे’.

‘जनताच आता भाजपा व मोदींना त्यांची जागा दाखवेल’

2014 साली खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारने शेतकरी, कामगार, सामान्य जनतेसह मध्यमवर्गांचे जगणेही मुश्कील करुन ठेवले आहे. काँग्रेस सरकारने उभे केलेले प्रकल्प विकण्याचा एकमात्र उद्योग गत सात वर्षांपासून धडाक्यात सुरु आहे. सरकारी कंपन्या, बँका, विमा, रेल्वे सर्वकाही उद्योगपती मित्रांच्या हवाली करुन देशाचे वाट्टोळे करण्याचे काम सुरु आहे. देशातील जनता मोदी सरकारच्या या कारभाराला कंटाळली असून महागाईवरुन जनतेत प्रचंड आक्रोश आहे, ही जनताच आता भाजपा व मोदींना त्यांची जागा दाखवेल, अशी टीकाही पटोले यांनी मोदी सरकारवर केलीय.

इतर बातम्या :

अनिल परब यांच्या अडचणीत आणखी वाढ; एसटी तिकीट यंत्र खरेदीप्रकरणी लोकायुक्तांपुढे उद्याच सुनावणी

Maharashtra Corona Update : ‘या’ देशातून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना RTPCR चाचणी बंधनकारक

Nana Patole criticizes Modi government over fuel price hike

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI