Goa Exit Poll result 2022 : गोव्यात भाजप आणि काँग्रेसही बहुमतापासून दूर! मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा दावा काय?

एक्झिट पोलनुसार गोव्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. मात्र, सर्वाधिक जागा भाजपला मिळण्याचा अंदाज टीव्ही 9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. अशावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात भाजपचीच सत्ता स्थापन होणार असा विश्वास व्यक्त केलाय.

Goa Exit Poll result 2022 : गोव्यात भाजप आणि काँग्रेसही बहुमतापासून दूर! मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा दावा काय?
प्रमोद सावंत
Image Credit source: ANI
सागर जोशी

|

Mar 07, 2022 | 9:30 PM

मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Election 2022) शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. त्यानंतर पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. त्यात छोट्या पण राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या गोव्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. एक्झिट पोलनुसार गोव्यात (Goa Assembly Election) कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही. मात्र, सर्वाधिक जागा भाजपला मिळण्याचा अंदाज टीव्ही 9 पोलस्टार्टच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. अशावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यात भाजपचीच सत्ता स्थापन होणार असा विश्वास व्यक्त केलाय.

गोव्यात भाजपला 18 ते 22 जागा मिळतील आणि आम्ही सरकार स्थापन करु. पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करणे हे आमच्या डबल इंजिन सरकारं प्राधान्य आहे. एक्झिट पोलनुसार भाजप उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि पंजाबमध्येही चांगली कामगिरी करु, असा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय.

टीव्ही 9 चा एक्झिट पोल काय सांगतो?

एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार, गोवा विधानसभेतील एकूण 40 जागांपैकी भाजपला 17 ते 19 जागा मिळतील. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना 11 ते 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, आप गोवा विधानसभेत आपलं खातं उघडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आपचे 1 ते 4 उमेदवार निवडून येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.

सध्याचं गोव्याचं बलाबल काय आहे?

गोवा विधानसभेच्या एकूण जागा 40 जागा आहेत. सध्या गोव्यात भाजपचे 17 आमदार असून काँग्रेसचे 13 आमदार आहेत. तर मगोपचे 3 आणि गोवा फॉरवर्डचे 3 आमदार होते. मात्र अनेक आमदारांनी निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर राजीनामे देत उमेदवारीसाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत पक्षांतर केलं होतं. तर अनेक उमेदवार ही अपक्षही निवडणुकीला सामोरे गेले आहेत.

इतर बातम्या : 

Manipur Exit Poll Result 2022 : मणिपूरमध्ये भाजपचाच बोलबाला, काँग्रेसला एक आकडी संख्येवरच अडकणार!

Uttarakhand Election Exit Poll Result 2022: उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस, कोण जिंकणार बाजी ?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें