हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन राज ठाकरेंच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर

हर्षवर्धन जाधव हे याआधी मनसेच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले होते. पुढील आठवड्यात होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे

हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन राज ठाकरेंच्या भेटीला 'कृष्णकुंज'वर
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 12:52 PM

मुंबई : मनसेच्या महाअधिवेशनाच्या तोंडावर राजकीय भूकंप घडण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव ‘कृष्णकुंज’वर गेले आहेत. त्यापाठोपाठ भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजनही ‘कृष्णकुंज’वर दाखल (Harshwardhan Jadhav Prakash Mahajan at Krishnakunja) झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दोन्ही नेते पोहचले असून हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन कोणती नवी राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हर्षवर्धन जाधव हे याआधी मनसेच्या तिकीटावर आमदारपदी निवडून आले होते. पुढील आठवड्यात होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. हर्षवर्धन पाटील मनसेमध्ये पुनरागमन करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

नुकतंच त्यांनी सासरे आणि भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही घर फोडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही जाधव यांच्यावर पैशांसाठी पत्नीला मारहाण करत माहेरी पाठवल्याचा गंभीर आरोप केला होता.

हेही वाचा : ‘मेगाभरती’मुळे भाजपचं कल्चर विचलित, चंद्रकांत पाटलांचा ‘तिरपा बाण’

हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय आलेख उतरत्या दिशेने असून त्यांना लोकसभेनंतर विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या राजकीय जीवनासोबतच व्यक्तिगत जीवनही नेहमीच वादळी ठरलं आहे. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष असा प्रचंड विस्कळीत राजकीय प्रवास करणाऱ्या हर्षवर्धन जाधव यांनी आजपर्यंत अनेकांवर गंभीर आरोप केले.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला 5 कोटींची ऑफर दिली, राज ठाकरे हे आपल्याला न्याय देऊ शकत नाही, उद्धव ठाकरे निष्क्रिय आहेत असे अनेक आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केले आहेत. आता तर हर्षवर्धन जाधव यांनी स्वतःचे सासरे रावसाहेब दानवेंवरच गंभीर आरोप केले. माझ्या बायकोला हाताशी धरुन रावसाहेब दानवे माझं राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.

प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांचे ज्येष्ठ बंधू. प्रकाश महाजन हे सक्रिय राजकारणात नसले तरी महाजन बंधूंच्या वादानंतर ते विशेषत्वाने प्रकाशझोतात आले. पंकजा मुंडे यांच्या राजकीय अस्थिरतेच्या काळातही ‘प्रकाशमामा’ पंकजा मुंडेंच्या मनस्थितीबद्दल बोलत आले होते. त्यामुळे महाजनांनी राज ठाकरेंची भेट (Harshwardhan Jadhav Prakash Mahajan at Krishnakunja) घेणं भुवया उंचावणारं आहे.

राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारलं, तर त्यांच्यासारखा मोठा हिंदुत्ववादी नेता नसेल, ते जी भूमिका घेतील ही स्वागतार्ह असेल, अशा भावना प्रकाश महाजन यांनी ‘टीव्ही9 मराठी’कडे बोलून दाखवल्या. ‘राज ठाकरे यांची भेट झाली. 23 तारखेला मनसेच्या महाअधिवेशनात मला बोलावलं आहे. राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा पटला म्हणून मला राज ठाकरे यांच्यासोबत काम करायचं आहे’ अशी इच्छा प्रकाश महाजन यांनी भेटीनंतर बोलून दाखवली.

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.