गृहमंत्र्यांचा मुलगा नागपूर झेडपी उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत

वडील गृहमंत्री झाल्यानंतर वजन वाढलेल्या सलील देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब होणं निश्चित मानलं जातं.

गृहमंत्र्यांचा मुलगा नागपूर झेडपी उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत

नागपूर : नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड 18 जानेवारीला होणार आहे. झेडपीचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं आहे. उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधून गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख रेसमध्ये (Salil Deshmukh Nagpur ZP) आहे.

भाजपचा पराभव करत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला जिल्हा परिषद निवडणुकीत मोठं यश आलं. काँग्रेसला 30, तर राष्ट्रवादीला 10 जागा मिळाल्या आहेत. त्यानुसार अध्यक्षपद काँग्रेस, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेलं आहे.

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचीही सलील देशमुख यांच्या नावाला पसंती आहे. त्यामुळेच सध्या तरी नागपूर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासाठी सलील देशमुख यांचं नाव आघाडीवर मानलं जात आहे.

सलील देशमुख हा राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भातील तरुण चेहरा. सलील देशमुख यांनी यावेळी पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. मेटपांजरा सर्कलमधून 4 हजार 397 मतांनी ते विजयी झाले.

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या आठवड्याभराच्या आतच देशमुख कुटुंबात डबल धमाका झाला होता. आता जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये त्यांचं नाव आघाडीवर आहे.

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षपद यावेळेस अनुसूचित जातीतील महिलांसाठी राखीव आहे. काँग्रेसने आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची घोषणा केली नाही, तर राष्ट्रवादीनेही उपाध्यक्षपदाचा दावेदार जाहीर केलेला नाही. पण वडील गृहमंत्री झाल्यानंतर वजन वाढलेल्या सलील देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब (Salil Deshmukh Nagpur ZP) होणं निश्चित मानलं जातं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI