AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचं शरद पवारांसमोर किती आव्हान?; जयंत पाटील काय म्हणाले?

शरद पवार आणि अजितदादांचा कधीच संघर्ष नव्हता. विधानसभा निवडणुकीत मी आणि अजितदादांनी तिकीट वाटप केलं. शरद पवार यांनी तिकीट वाटपात हस्तक्षेप केला नाही. पूर्ण ताकदीने आम्ही काम करायचो. कुणी कुचराई केलीय असं वाटत नाही, असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी बारामती, शिरूर, माढा, दिंडोरी, नगर लोकसभा निवडणूक जिंकणार असल्याचा दावाही केला.

अजित पवार यांचं शरद पवारांसमोर किती आव्हान?; जयंत पाटील काय म्हणाले?
jayant patilImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Mar 01, 2024 | 6:01 PM
Share

मुंबई | 1 मार्च 2024 : लोकसभा निवडणुका कधीही लागण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात तर गेल्या दोन वर्षात राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. पूर्वी राज्यात चार प्रमुख पक्ष होते. आता सहा झाले आहेत. मात्र हे सहाही पक्ष युती आणि आघाडीत विभागल्या गेले आहेत. यावेळची निवडणूक अत्यंत रंगतदार होणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. त्यातही शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार गट असाही सामना रंगणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत शरद पवार यांना अजित पवार यांचं किती आव्हान असेल? याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच मोठी माहिती दिली आहे.

टीव्ही9 मराठीच्या लोकसभेचा महासंग्राममध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आमच्यासमोर फुटून गेलेल्यांचं आव्हान नाहीच आहे. आमच्यासमोर भाजपचं आव्हान आहे. आमची लढाई भाजपसोबत आहे. राज्यातील बहुसंख्य मतदार हा शरद पवार यांच्या बाजूने आहे. जे फुटून गेले, त्यांच्यामुळे फक्त काही टक्के मते आमची गेली. पण फार फरक पडत नाही. त्यामुळे आता आम्ही 35 टक्के मतदान असणाऱ्यांवर बोलायचं की चार टक्के मतदान असणाऱ्यांवर हे तुम्हीच सांगा, असं जयंत पाटील म्हणाले.

सह्या घेतल्या असं नाही

अजित पवार आणि त्यांचे सहकारी पक्षातून का गेले यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्हाला तिकडे जावं लागेल असं या लोकांनी दीड महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं. तसा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांच्या काही अडचणी होत्या. त्यामुळे त्यांना त्या अडचणी सोडवण्यासाठी हाच मार्ग योग्य वाटत होता. त्यांच्यातील आठ दहा जणांना जावं वाटत होतं. त्यांनी आमदारांकडून सह्या घेतल्या. हे सुरुवातीला झालं. त्यांनी आमदारांना एकत्र केलं आणि सह्या घेतल्या असं नाही. त्यांच्या अडचणई काय होत्या हे माहीत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आमदारांचा भाजपसोबत जाण्याचा अट्टास नव्हता. तुम्ही ठरवाल ते करू असं आमदार म्हणायचे.

त्यानंतर संदिग्धता निर्माण झाली

भाजपसोबत जाण्याची शरद पवार यांनी 2014मद्ये भूमिका घेतली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. 2014 मध्ये शरद पवार यांनी भूमिका घेतली होती. पण पाठिंबा दिला नाही. त्यानंतर संदिग्धता तयार झाली आणि त्यानंतर पाच वर्ष दोन्ही पक्षाचे जुळले नाही. त्यानंतर काय झालं हे पाहिलंच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवार यांनी ज्या काही भूमिका घेतल्या. त्या सर्व पक्ष रिलेव्हंट ठेवण्यासाठीच, असा दावाही त्यांनी केला.

त्या गाफिल राहिल्या नाही

सुप्रिया सुळे यांनी गेल्या दहा वर्षात सर्वात चांगली कामगिरी केली. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. दशकातील बेस्ट परफॉर्मर म्हणून त्यांची निवड झाली. त्यांनी संपूर्ण बारामती पिंजून काढला आहे. वडिलांचं नाव आहे, भाऊ पाठी आहे म्हणून त्या गाफिल राहिल्या नाहीत. त्या काम करत गेल्या, असंही ते म्हणाले.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.