AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी अजून माघार घेतलेली नाही : अर्जुन खोतकर

जालना: मी अजून जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेली नाही, असं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. एकीकडे भाजपच्या संभाव्य यादीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं नाव असल्यामुळे,  अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना अर्जुन खोतकरांनी आपण अद्याप रेसमध्ये असल्याचं म्हटलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माझ्याबाबतीत चर्चा झाल्याची माहिती मला समजली […]

मी अजून माघार घेतलेली नाही : अर्जुन खोतकर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

जालना: मी अजून जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतलेली नाही, असं शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. एकीकडे भाजपच्या संभाव्य यादीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं नाव असल्यामुळे,  अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याची चर्चा आहे. त्याबाबत बोलताना अर्जुन खोतकरांनी आपण अद्याप रेसमध्ये असल्याचं म्हटलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माझ्याबाबतीत चर्चा झाल्याची माहिती मला समजली आहे. पण मी अजून जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली नाही. माझ्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेणार आहेत. मात्र त्यांचा अजून मला कोणताही निरोप आलेला नाही. त्यामुळे आज किंवा उद्या मी त्यांची भेट घेणार आहे, असं शिवसेना नेते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.

खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली असल्याची चर्चा होती. मात्र आपल्या संदर्भात अजून कोणताही निर्णय झाला नसून, उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील, असंही खोतकर यांनी स्पष्ट केलं.

खोतकरांकडे समन्वयकाची जबाबदारी

अर्जुन खोतकर यांना शिवसेनेकडून लोकसभेसाठी मराठावाडा विभागाच्या समन्वयपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, खोतकरांच्या जालन्यातील घराबाहेर शिवसैनिकही जमले असून, खोतकरांच्या उमेदावारीसाठी घोषणा दिल्या जात आहेत.

भाजपची संभाव्य 7 उमेदवार

भाजपने पहिल्या यादीतच जालन्यातील उमेदवाराचे नाव निश्चित केले आहे. आज किंवा उद्या भाजपची पहिली यादी जाहीर होऊ शकते. यात जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव आहे. त्यामुळे अर्जुन खोतकरांचं आव्हान संपुष्टात आले आहे.

दानवे आणि खोतकरांचा वाद राज्यात तुफान गाजला. दोघांनी एकमेकांवर जाहीरपणे टीका केली. दानवेंविरोधात खोतकरांनी शड्डू ठोकला होता. दानवेंचा पराभव करणारच, अशा घोषणाही खोतकरांनी जालन्यातील सभांमधून जाहीरपणे दिल्या होत्या. मात्र, आता खोतकरांच्या माघारीमुळे दानवेंना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या 

अर्जुन खोतकरांचं बंड थंडावलं, एका पदावर बोळवण  

शिवसेनेच्या सर्व 23 संभाव्य उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती  

शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या सभेचं स्थळ आणि तारीख ठरली!  

भाजपची पहिली यादी, 7 नावं फायनल 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...