मी 'पार्थ' आहे, बोलण्यात नव्हे, कामावर विश्वास : पार्थ पवार

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पवार कुटुंबासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रचार मावळ लोकसभेत सुरु केला आहे. यावेळी पार्थ पवार यांनी …

, मी ‘पार्थ’ आहे, बोलण्यात नव्हे, कामावर विश्वास : पार्थ पवार

पुणे : मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पवार कुटुंबासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रचार मावळ लोकसभेत सुरु केला आहे. यावेळी पार्थ पवार यांनी मावळमध्ये प्रचारा दरम्यान शेतकऱ्यांना म्हणाले, “मी पार्थ आहे मी बोलण्यात नाही, तर काम करण्यात विश्वास ठेवतो”

मावळमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी जात असताना एका शेतामध्ये काम करत असलेल्या शेतकऱ्यांना पार्थ पवार यांनी भेट दिली. त्यावेळी शेतकऱ्यांनी या सरकारमुळे शेतकरी वर्गात किती नुकसान झालं आहे. त्यांची आर्थिक बाजू किती कमकुवत झाली आहे, अशा अनेक अडचणी पार्थ पवार यांना सांगितल्या. यावेळी पार्थ पवारांनीही शेतकरी कुटुंबांना शब्द दिला, “पार्थ बोलून दाखवत नाही, तर काम कशाप्रकारे शानसकडून करुन घ्यायचे यावर भर देतो. मी जर खासदार झालो तर गावपातळीवर विकास करेन”, असं आश्वासनही पार्थ पवार यांनी शेतकऱ्यांना दिले.

रिक्षा, लोकलनंतर बैलगाडीतून पार्थचा प्रवास

पार्थ पवार यांच्या प्रचारा दरम्यान आतापर्यंत रिक्षा, रेल्वे तसेच आज बैलगाडीतून पार्थनं प्रवास केला. आज मावळ विधानसभेत पार्थ यांचा प्रचार सुरु होता. यावेळी मावळ तालुक्यातील शिवणे गावात पार्थ यांनी बैलगाडीत बसून थेट सारथ्य केलं. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पार्थ वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत.

पार्थच्या अनोख्या स्टंटमुळे सध्या मावळ तालुक्यात पार्थच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. बुधवारी (27 मार्च) पार्थ सभेच्या ठिकाणी उशीर होईल म्हणून थेट गाडीतून उतरुन रस्त्यावर धावू लागला. यावेळी रस्त्याच्या बाजूचे सर्वजण आश्चर्यचकीत झाले. मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांच्यात कडवी लढत होताना दिसणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *