AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली?; संजय राऊत म्हणाले, मला माहीत होतं…

मी पक्षाला आई मानतो. कुठून काही तरी मिळतंय म्हणून पक्षाच्या पाठित खंजीर खुपसणं योग्य नाही. माझ्या सुटकेनंतर लोकांना आनंद झाला. ते शिवसैनिक होते. ते सर्व अचानक बाहेर पडले.

तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली?; संजय राऊत म्हणाले, मला माहीत होतं...
तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली?; संजय राऊत म्हणाले, मला माहीत होतं... Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 10, 2022 | 2:43 PM
Share

मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे तब्बल 102 दिवसानंतर तुरुंगातून सुटले आहेत. पत्राचाळ घोटाळ्यात त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. पण आपल्याला अटक होणार हे राऊत यांना आधीच माहीत होतं. त्याचं सुतोवाच त्यांनी वेळोवेळीही केलं आहे. पण राऊत यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटली नाही का? त्यांना तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली? असा सवाल निर्माण झाला आहे. त्याचं उत्तर खुद्द राऊत यांनीच दिलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत राऊत यांनी त्यावर भाष्य केलं आहे.

मी तुरुंगात गेलो. मला खात्री होती. उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. त्या हिंमतीवर मी तुरुंगात गेलो, असं सांगतानाच आमच्या मूळ शिवसेनेसाठी दहावेळा तुरुंगात पाठवलं तरी मी तुरुंगात जायला तयार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

कधी तरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते. ती तयारी नसेल तर पक्षाने 40 वर्षात जे दिलं. त्याच्याशी कृतघ्नता ठरेल. बाळासाहेबांपासून आदित्यपर्यंतचं नातं टिकलं पाहिजे. आम्ही कितीही सर्वोच्च स्थानी पोहोचलो तरी पक्षाशी बेईमानी करणं योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.

मी पक्षाला आई मानतो. कुठून काही तरी मिळतंय म्हणून पक्षाच्या पाठित खंजीर खुपसणं योग्य नाही. माझ्या सुटकेनंतर लोकांना आनंद झाला. ते शिवसैनिक होते. ते सर्व अचानक बाहेर पडले. जेलच्या गेटमधून बाहेर पडताना मला अडिच तास लागले. एवढी गर्दी होती, असं सांगतानाच राज्यात शिवसेना एकच आहे. गटबिट काहीच नाही. आमच्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हेच आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

यावेळी राऊत यांनी स्वत:ला युद्धकैदी संबोधलं. तसेच पुस्तक लिहून तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तुरुंगातील एक एक तास 100 दिवसांसारखा असतो. तुरुंगात राहणं फार कठिण आहे. मी स्वत:ला वॉर प्रिझनर मानतो. युद्धकैदी, असं ते म्हणाले.

माझं पुस्तक तयार आहे. दोन पुस्तक मी तुरुंगात लिहिली आहेत. वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. मी लिहिणारा माणूस आहे. मी तुरुंगात वाचत होतो. जे वाचलं मग पेपरच्या बातम्या. पुस्तकातील गोष्टी असो, जे आवडलं ते टिपलं. हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. इतिहास आणि राजकीय घडामोडींचा या पुस्तकात मागोवा घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा