कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान होणारच, महादेव जानकरांची गर्जना

राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला.

कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान होणारच, महादेव जानकरांची गर्जना
Mahadev Jankar
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 3:16 PM

कोल्हापूर : मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन असा दावा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला. ते कोल्हापुरात बोलत होते. (I will take support from anyone, but one day I will become the Prime Minister, said Maharashtra former Mahadev Jankar in Kolhapur)

काँग्रेस- राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मी मात्र पाणंदीने पुढे चाललो आहे. माझाही सूर्य कधी तरी उगवेल अशी देखील आशा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चार तारखेला राष्ट्रीय समाज पक्ष राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती जानकर यांनी दिली. सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यावर विचारला असता ते माझ्या पक्षात नाहीत, त्यांच्यावर बोलून त्यांना का मोठं करू असं म्हणत त्यांनी यावर बोलणं टाळलं.

मी पंतप्रधान होणारच : महादेव जानकर

पंतप्रधानपदाबाबत जानकर म्हणाले, “आमच्या पक्षाचं ध्येय हे दिल्ली आहे. टार्गेट दिल्ली ठेवून आमच्या पक्षाची वाटचाल सुरु आहे. मी एक ना एक दिवस पंतप्रधान जरुर होईन. त्यासाठी मला कुणाचीही मदत घ्यावी लागली, कुणाचाही आधार घ्यावा लागला तर ती घेईन. पण मी पंतप्रधान होणारच”

जानकरांची कारकीर्द 

राज्यात 2014 मध्ये  देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे कॅबिनेट मंत्री झाले होते.  भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी डोक्यावर ठेवलेला हात, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंविरोधात बारामतीतून दिलेली लढत आणि फडणवीस यांच्या सरकारात मिळालेलं मंत्रिद यामुळे फडणवीस चर्चेत आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्रंही झाले.

चार लोकसभा लढल्या

जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत मातब्बर लोकांनाच आव्हान दिलं. त्यांनी नांदेड (1998), सांगली (2006), माढा(2009), बारामती (2014) अशा चार लोकसभाही जानकरांनी लढवल्या. प्रत्येक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण जानकर पराभूत होऊनही चर्चेत राहिले.

संबंधित बातम्या 

कांशीराम यांच्यापासून प्रेरणा; महादेव जानकरांच्या तीन भीष्म प्रतिज्ञा; वाचा, कसा आहे राजकीय प्रवास!

“गोपीनाथराव असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं, ते नसल्याने सत्ता गेली”

Non Stop LIVE Update
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.