औरंगाबादमध्ये एमआयएमचा निकालाअधीच जल्लोष

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच औरंगाबादमध्ये एमआयएमने जल्लोष साजरा करायला सुरुवात केली. एमआयएमच्या उत्साही कार्यकर्त्यांनी शहरात बाईक रॅली काढून जल्लोष साजरा केला. तर काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी उभे होते. निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील हेच विजयी …

औरंगाबादमध्ये एमआयएमचा निकालाअधीच जल्लोष

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच औरंगाबादमध्ये एमआयएमने जल्लोष साजरा करायला सुरुवात केली. एमआयएमच्या उत्साही कार्यकर्त्यांनी शहरात बाईक रॅली काढून जल्लोष साजरा केला. तर काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील हे यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी उभे होते. निवडणूक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील हेच विजयी होणार, असं गृहीत धरून जल्लोष साजरा केला.

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल 23 एप्रिलला पार पडलं. औरंगाबादमध्येही काल लोकसभेसाठी मतदान झालं. त्यानंतर निकालाची वाट न पाहता दुसऱ्याच दिवशी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी इम्तियाज जलील हेच औरंगाबाद मतदारसंघातून निवडून येणार, असा विश्वास या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता निवडणुकांचे निकाल या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर किती खरे उतरतात हे बघणं औत्सुक्त्याचं ठरणार आहे.

गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. शिवसेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यामुळे औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीला रंगतदारपणा आलाय. त्यामुळे यावेळी औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत दिसून आली.

52 दरवाजांचे शहर अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहरावर गेल्या 20 वर्षांपासून शिवसेनेची एक हाती सत्ता आहे. महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता, जिल्हा परिषदेत शिवसेनेची सत्ता, तर शहराचा खासदारही शिवसेनेचा. त्यामुळे औरंगाबाद शहराला शिवसेनेचा गड मानला जातो. गेल्या 20 वर्षांपासून निवडून येणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात निर्माण झालेली anti-incumbency आणि त्यांच्यासमोर निर्माण झालेली अनेक आव्हाने, त्यामुळे या वेळेला चंद्रकांत खैरे हे निवडून येतीलच याची खात्री कुणीही देत नाही. त्यातच औरंगाबादमधून काँग्रेस आणि एमआयएमनेही तगडे उमेदवार उभे केल्याने शिवसेनेसमोर गड राखण्याचं मोठं आव्हान आहे.

यावेळी औरंगाबादच्या लोकसभा निवडणुकीत खरी चुरस निर्माण झाली ती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीमुळे. त्यांनी काँग्रेसच्या पारंपारिक मतावर दावेदारी करत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. परंतु त्यांनी खरं आव्हान निर्माण केलंय ते चंद्रकांत खैरे यांच्यासमोर.  इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीमुळे चंद्रकांत खैरे यांची चांगलीच दमछाक झालेली बघायला मिळतेय.

औरंगाबाद लोकसभा निवडणूक 2019 इम्तियाज जलील हेच जिंकणार, असा विश्वास एमआयएम कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी निकालाचीही वाट न बघता आधीच इम्तियाज जलील यांच्या विजयी होण्याचा जल्लोष साजरा केला.

लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान काल 23 एप्रिलला पार पडलं. यावेळी औरंगाबाद मतदारसंघात एकूण 61.87 टक्के मतदान पार पडलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *