राजकाणासाठी वाट्टेल ते, डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी मौनव्रताची परंपरा मोडली

राजकाणासाठी वाट्टेल ते, डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी मौनव्रताची परंपरा मोडली

सोलापूर: राजकारणात आल्यावर परंपरा, निष्ठा, तत्वे सोडावी लागतात असं म्हणतात ते काही खोटं नाही. नुकतंच याची प्रचिती सोलापुरात आली. गुरुवार हा तसा महाराजांचा मौनव्रताचा दिवस. काहीही झाले तरी एक दिवस आपलं मौनव्रत ठेवण्याची डॉ. जयसिद्धे श्वर शिवाचार्यांची स्वतःचीच परंपरा आहे. मात्र आज त्यांनी स्वतःचीच परंपरा मोडून मौनव्रत सोडलं. केवळ भाजपच्या जिल्हाध्यक्षांच्या आग्रहाखातर त्यांनी परंपरा मोडून मौनव्रत सोडलं.

सोलापूरच्या राखीव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांची चर्चा आहे. डॉ. शिवाचार्य हे सहकारमंत्री सुभाष देशमुख,पालकमंत्री विजयकुमार देशमुखांबरोबर जिल्ह्याच्या विविध ठिकाणी बैठका घेत आहेत. आज अक्कलकोट इथे दोन्ही मंत्र्याच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली होती. त्यात भाजपच्या जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी महाराजांनी मौनव्रत सोडून देऊन, उपस्थितांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देण्यासाठी आणि समोरील वोट बँकेवर डोळा ठेवून डॉ. शिवाचार्य यांनी आपलीच परंपरा मोडून उपस्थितांना कन्नडमध्ये मार्गदर्शन केले.

एकूणच राजकारणात प्रवेश केल्यानंतर परंपरा,तत्वे,निष्ठांना कशी बगल द्यावी लागते याचा अनुभव स्वतः शिवाचार्यांना आणि गुरुवारी मौनवृतात पाहणाऱ्या शिवाचार्यांच्या भक्तांना आज आला.

कोण आहेत डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य

  • डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे जंगम समाजातील बेडा जंगम समाजातील आहेत.
  • अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव या मठाचे मठाधीश आहेत.
  • सोलापुरातल्या शेळगी येथे मठात वास्तव्यास आहेत
  • त्यांनी उत्तरप्रदेशातील बनारस विद्यापीठातून पीएचीडी मिळवली आहे. त्यांचं हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे.
  • गुरुसिधमल्लेश्वर कल्याण केंद्राच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु केले आहेत.
  • मागासवर्गीय विद्यांर्थ्यांसाठी वसतीगृहांची स्थापना केली आहे,
  • शेजारच्या कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये शिवाचार्यांचे भक्त आहेत.

संबंधित बातम्या 

शरद बनसोडेंचा पत्ता कट, सोलापूरसाठी भाजपचा उमेदवार ठरला : सूत्र

डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारीला लिंगायत समाजाचाच विरोध   

सुशील कुमार शिंदेंना पुन्हा धक्का, भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी मैदानात?  

सोलापूर मतदारसंघात भाजपचे दोन खासदार विरुद्ध जयसिद्धेश्वर महास्वामी   

प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात एंट्री, शिंदेशाही पुन्हा धोक्यात  

Published On - 4:06 pm, Thu, 21 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI