‘वैयक्तिक टीका कराल तर उत्तर मिळणारच’, नारायण राणेंना शिवसेना नेत्यांचा इशारा

राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय.

'वैयक्तिक टीका कराल तर उत्तर मिळणारच', नारायण राणेंना शिवसेना नेत्यांचा इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 6:08 PM

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. आमची भूमिका प्रामाणिक आहे. जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन व्यक्त होत असते, अशा शब्दात उदय सामंत याांनी राणेंना इशारा दिलाय. (Uday Samant and Vaibhav Naik warn Narayan Rane)

जन-आशीर्वाद कुणी काढावी हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांना केंद्रीय स्तरावरून सांगितलं असेल. पण आम्ही ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाला मानणारे नेते आहोत. उद्धव साहेबांना मानणारे नेते आहोत. उद्धव साहेब आमचं दैवत आहेत. त्यांच्यावर टीका होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली पाहिजे. संयम पाळला पाहिजे. तशी टीका झाली तर त्याचे परिणाम काय होतात हे चार दिवसांपूर्वी प्रत्येकाने बघितलं आहे, असा टोलाही सामंतांनी यावेळी लगावलाय. टीका जरी पुन्हा सुरू झाली असली तरी प्रत्येकाने संयमाने वागलं पाहिजे. जशी अॅक्शन तशी रिअॅक्शन व्यक्त होत असते. चांगल्या पद्धतीची अॅक्शन झाली तर रिअॅक्शनही तशी असेल, असंही सामंत म्हणाले. सिंधुदुर्गात जे दाखल होत आहेत त्यांनी जनतेचा आशीर्वाद घ्यावा. इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार हे त्यांनी सांगावं. GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे, अशी टोलेबाजी सामंतांनी केलीय.

‘यात्रा ही आशीर्वाद घेण्यासाठीच असावी’

राणेंनी केलेल्या वैयक्तिक टीकेलाही सामंत यांनी उत्तर दिलंय. अशा पद्धतीची टीका यापूर्वीही झाली होती. त्यातूनही उद्धव ठाकरेंनी काम केलेले आहे. कोव्हीडच्या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाचा आदर्श देशाने घेतला आहे. त्याचे सगळ्याच पक्षांनी कौतुक केलं पाहिजे. वैयक्तिक टीका करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासासाठी काय हवे हे जनआशीर्वाद यात्रेत सांगितले पाहिजे. जे काही विधान झालं त्यांनतर त्याची काय प्रतिक्रिया उमटली ते देशाने पाहिलं आहे. त्यानंतर काही केंद्रीय नेत्यांचे फोन आले. हा विषय घडला त्यावर काय रिअॅक्शन येते हे शिवसैनिकांनी दाखवून दिले. जनआशीर्वाद यात्रा ही आशीर्वाद घेण्यासाठीच असावी, असंही सामंत म्हणाले.

वैभव नाईकांचाही राणेंना इशारा

सुरुवातीलाच सांगितलं आहे की उद्धवजींवर टीका झाली तर त्याच पद्धतीनं उत्तर दिले जाईल. त्यावर आम्ही ठाम आहोत. पण आता बघितलं तर रत्नागिरीपासून सिंधुदुर्गात येईपर्यंत नाव न घेता टीका सुरू झालीय. पण सिंधुदुर्गात येईपर्यंत टीकाच होणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असा टोला वैभव नाईक यांनी राणेंना लगावलाय. टीका झालीच तर त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन टीका झाली तर संयम राहणार नाही, असंही नाईक म्हणाले.

संबंधित बातम्या :

दोन राऊतच शिवसेनेला पार खोल डुबवणार, नारायण राणेंचा हल्लाबोल

आम्ही विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो नाही, आम्हीही सत्तेत येऊ; नारायण राणे कडाडले

Uday Samant and Vaibhav Naik warn Narayan Rane 

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.