भोपाळमध्ये दिग्विजय म्हणाले, ‘जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रातले दिग्विजय सिंह’!

भोपाळ :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड हे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशात दाखल झाले. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दिग्विजय सिंह विरुद्ध भाजपकडून साध्वी प्रज्ञा ठाकूर अशी लढत होत आहे. साध्वी प्रज्ञाने शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं अपमानजनक वक्तव्य, तसंच मालेगाव स्फोटातील आरोपांमुळे, जितेंद्र आव्हाड हे प्रज्ञा ठाकूरविरोधात प्रचार करण्यास पोहोचले. यावेळी …

भोपाळमध्ये दिग्विजय म्हणाले, ‘जितेंद्र आव्हाड महाराष्ट्रातले दिग्विजय सिंह’!

भोपाळ :  राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड हे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशात दाखल झाले. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये दिग्विजय सिंह विरुद्ध भाजपकडून साध्वी प्रज्ञा ठाकूर अशी लढत होत आहे. साध्वी प्रज्ञाने शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं अपमानजनक वक्तव्य, तसंच मालेगाव स्फोटातील आरोपांमुळे, जितेंद्र आव्हाड हे प्रज्ञा ठाकूरविरोधात प्रचार करण्यास पोहोचले.

यावेळी दिग्विजय सिंह यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यासोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. “जितेंद्र आव्हाड म्हणजे महाराष्ट्रातले दिग्विजय सिंह आणि भोपाळमधले दिग्विजय सिंह म्हणजे मध्य प्रदेशचे जितेंद्र आव्हाड”, असं दिग्विजय सिंह म्हणाले.

दरम्यान, भोपाळ लोकसभेसाठी 12 मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून आघाडीचे काही नेते दिग्विजय सिंह यांच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशात दाखल झाले आहेत.

साध्वी प्रज्ञाचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, भोपाळमधील भाजपची लोकसभा उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरने शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत काही दिवसापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिच्यावर चहूबाजूंनी टीका झाल्यानंतर साध्वीने माफी मागितली होती. प्रज्ञा ठाकूर म्हणाली होती, “हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं”, असं साध्वी म्हणाली.

मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञासिंगविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर तिने माफीही मागितली. शिवाय हे माझं वैयक्तिक मत होतं, असं स्पष्टीकरण दिलं.

संबंधित बातम्या  

निवडणूक आयोगाकडून प्रज्ञा ठाकूरांच्या प्रचारावर 72 तासांची बंदी 

अतिरेक्यांनी शहीद हेमंत करकरेंना मारुन माझं सूतक संपवलं, साध्वी प्रज्ञा बरळली   

शहीद हेमंत करकरेंवरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *