कोल्हापुरात राष्ट्रवादीनंतर काँग्रेसलाही मोठं भगदाड

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे (Congress-NCP) आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह कार्यकर्ते शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसला धक्का बसला आहे.

कोल्हापुरात राष्ट्रवादीनंतर काँग्रेसलाही मोठं भगदाड

कोल्हापूर : महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे (Congress-NCP) आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह कार्यकर्ते शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) प्रवेश करत आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातही काँग्रेसला धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी आज (4 सप्टेंबर) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला लागलेली गळतीने आगामी निवडणुकीत त्यांची काळजी वाढली आहे. मागील लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती लागली आहे. विधानसभा निवडणुकांआधी याला बराच वेग आला आहे. काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पक्षाकडून दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच जिल्हाध्यक्षपदाचासह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.


प्रकाश आवाडेंकडे 6 महिन्यांपूर्वीच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी पक्षाच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढण्याचे किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. प्रकाश आवाडे म्हणाले, “संपूर्ण राज्यांमध्ये काँग्रेस पक्षावर नाराजीचा सूर आहे. काँग्रेस पक्षाने कोल्हापूर जिल्ह्यात आमच्यासोबत दुजाभाव केला. त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. आगामी विधानसभा अपक्ष म्हणून लढू. तसेच 2 दिवसांमध्ये शिवसेना प्रवेशावर भूमिका स्पष्ट करू.”

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे मागील 65 वर्षांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मी काँग्रेस पक्षात एकनिष्ठपणे काम केलं आहे. पण आजपर्यंत आवाडे गटाला काँग्रेस पक्षांने दुजाभाव दिला. सध्या देशभरात काँग्रेस पक्षाबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कलम 370 मध्ये बदल केल्यानंतर काही काँग्रेस नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला. आपण ज्या देशात राहतो त्या देशाबरोबर राहायचं सोडून काँग्रेसने 370 कलमाच्या विरोधात भूमिका घेतली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगासाठी प्रकाश आवाडे यांनी आगामी विधानसभा अपक्ष म्हणून लढवावी किंवा कोणत्याही पक्षाने तिकीट दिल्यास त्या पक्षाच्या चिन्हावर लढवावी, असा खोचक सल्ला आवाडे यांनी दिला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *