AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात आमदाराच्या कुटुंबियांना ‘कोरोना’; मुलगा, सून, नातवाला लागण

इचलकरंजी शहरात काल दिवसभरात सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 60 वर पोहोचली आहे

कोल्हापुरात आमदाराच्या कुटुंबियांना 'कोरोना'; मुलगा, सून, नातवाला लागण
| Updated on: Jul 05, 2020 | 11:44 AM
Share

इचलकरंजी : कोल्हापुरात आमदाराच्या घरातील चौघांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. विद्यमान आमदाराचा मुलगा, सून, नातवासह नोकराला कोरोना संसर्ग झाला. आमदाराच्या घरातच चौघे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. चौघांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. (Kolhapur Ichalkaranji MLA Family Corona Positive)

दरम्यान, इचलकरंजी शहरात काल दिवसभरात सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 60 वर पोहोचली आहे, तर बळींचा आकडा 4 वर गेला आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इचलकरंजी शहरात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील 25 टक्के भाग हा कंटेन्मेंट झोन झाला आहे.

खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी शहरवासियांना ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन केले आहे. शहरामध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. इचलकरंजी शहर वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. नागरिकांनी प्रशासनाची वाट न पाहता आपल्या शहरासाठी आपणहून लॉकडाऊन पाळले पाहिजे. शहरवासियांनी आपले व्यवहार आपणहून बंद ठेवावेत, असे आवाहन धैर्यशील माने यांनी केले.

पुण्याचे महापौर कोरोनाच्या विळख्यात

दुसरीकडे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, शनिवारी (4 जुलै) सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र उर्वरित चारही नगरसेवक कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

राज्यात यापूर्वी काही मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण झाली होती. तर नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता.

पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. तर भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. (Kolhapur Ichalkaranji MLA Family Corona Positive)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.