कोल्हापूर ZP तील भाजपच्या विरोधीपक्ष नेत्याविरोधात महिला अधिकाऱ्याची तक्रार, विनयभंगाचा गुन्हा

विजय भोजे यांनी आपल्याला घरी बोलावून विनयभंग केल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. (Kolhapur Zilla Parishad BJP Molestation)

कोल्हापूर ZP तील भाजपच्या विरोधीपक्ष नेत्याविरोधात महिला अधिकाऱ्याची तक्रार, विनयभंगाचा गुन्हा
कोल्हापूर जिल्हा परिषद
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 8:02 AM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेतील महिला अधिकाऱ्याच्या गंभीर आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे पक्षप्रतोद आणि विरोधीपक्ष नेते विजय भोजे यांच्यावर महिलेने विनयभंगाचा आरोप केला आहे. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर विजय भोजे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Zilla Parishad BJP leader Molestation accused)

कोल्हापूरमधील शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोजे यांनी आपल्याला घरी बोलावून विनयभंग केल्याचा दावा महिलेने तक्रारीत केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विजय भोजे हे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपचे पक्षप्रतोद आणि विरोधी पक्ष नेते आहेत.

“मॅट घोटाळा बाहेर काढल्याचा रागातून आरोप”

दरम्यान, विजय भोजे यांनी मात्र आपल्यावरील विनयभंगाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मॅट घोटाळा बाहेर काढल्याचा रागातून आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवल्याचा दावा त्यांनी केला आहे. विनयभंगाचे खोटे आरोप करुन गुन्हा दाखल केल्याचा दावा विजय भोजेंनी केला आहे.

विजय भोजे यांच्या समर्थनार्थ सत्ताधारी आणि विरोधी सदस्य आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत या प्रकरणावरुन घमासान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अल्पवयीन मुलीवरील विनयभंगाच्या आरोपानंतर मठाधिशाची सुसाईड नोट

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी बीडमधील कोळगाव येथील सूर्य मंदिर संस्थानचे मठाधीश हनुमान महाराज याच्यावर चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मठाधिश फरार आहे. घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली होती. मात्र, हा गुन्हा खोटा असून यात मी निर्दोष आहे. त्यामुळे मी आता आत्महत्या करत आहे, अशा सुसाईड नोटसह व्हिडीओ स्वतः मठाधिशाने व्हायरल केला होता.

भाजप नेते मुन्ना यादव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्य कामगार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष मुन्ना यादव यांच्याविरोधात नागपूर शहर पोलिसांनी महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मुन्ना यादव हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत. मालमत्ता वादाशी संबंधित असलेल्या प्रकरणामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे

संबंधित बातम्या :

भाजप नेता मुन्ना यादववर विनयभंगाचा गुन्हा

अल्पवयीन मुलीवरील विनयभंगाच्या आरोपानंतर मठाधिशाची सुसाईड नोट आणि व्हिडीओ समोर

(Kolhapur Zilla Parishad BJP leader Molestation accused)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.