AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लडाखच्या भाजप खासदाराची संसदेत तुफान फटकेबाजी, मोदींकडून भाषणाचा व्हिडीओ शेअर

कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्या खासदारांवर भाजप खासदार सेरिंग नामग्याल तूफान बरसले. मोदी सरकार येण्यापूर्वी लडाखच्या जनतेवर अन्याय झाल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या.

लडाखच्या भाजप खासदाराची संसदेत तुफान फटकेबाजी, मोदींकडून भाषणाचा व्हिडीओ शेअर
| Updated on: Aug 07, 2019 | 2:11 PM
Share

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरातील कलम 370 (Jammu Kashmir Article 370) वर लोकसभेत मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान लडाख (Ladakh) मधील भाजप खासदार सेरिंग नामग्याल (Tsering Namgyal) यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणामुळे प्रभावित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विटरवर सेरिंग यांच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केला. लडाखमधील जनतेवर कायम अन्याय होत असल्याच्या भावना व्यक्त करत कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्यांना नामग्याल यांनी गप्प केलं.

कलम 370 रद्द करण्यास विरोध करणाऱ्या खासदारांवर सेरिंग तुफान बरसले. जम्मू काश्मीरच्या राज्य सरकारांनी लडाखमधील नागरिकांना नोकरी देताना नेहमीच पक्षपात केला. काँग्रेसने कलम 370 चा गैरवापर करत लडाखमधून बौद्ध संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला. लडाखची जनता केंद्रशासित प्रदेश होण्याच्या बाजूने आहे, अशी भूमिका सेरिंग यांनी मांडली.

कलम 370 चा चुकीचा वापर करत काश्मीरी पंडितांना बाहेर काढण्यात आलं. आतापर्यंत लडाखमध्ये एकही उच्च शिक्षण संस्था नव्हती. मोदी सरकार आल्यानंतर पहिल्यांदा इथे विश्वविद्यापीठ सुरु झालं, असं सेरिंग म्हणाले.

‘कलम 370 च्या आडून लडाखवर अन्याय होत आला. मात्र या विधेयकातून लडाखमधील जनतेच्या आकांक्षा आणि अपेक्षांचा सन्मान राखण्यात आला.’ असं ते म्हणाले.

आतापर्यंत लडाखच्या विकासासाठी गठित केलेला निधी काश्मीरच्या विकासासाठी वापरण्यात आला. लडाखच्या जनतेसोबत नेहमीच अन्याय झाला. मात्र मोदी सरकारने या क्षेत्राला स्वतःची ओळख दिली, असंही ते म्हणाले.

सरकारने नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत या विधेयकावर झालेल्या चर्चेदरम्यान केला होता. काश्मीरला तुम्ही द्वीपक्षीय प्रश्न मानता का नाही, यावर सरकारचं उत्तर काँग्रेसला अपेक्षित होतं.

सेरिंग यांच्या भाषणानंतर भाजपच्या इतर खासदारांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. इतकंच नाही, तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही नामग्याल यांची तारीफ करण्याचा मोह आवरला नाही.

34 वर्षांचे सेरिंग नामग्याल पहिल्यांदाच खासदारपदी निवडून आले आहेत. भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठं लोकसभा क्षेत्र  असलेल्या लडाखचे ते खासदार आहेत. सेरिंग यांचा जन्म 4 ऑगस्ट 1985 रोजी लेहमधील माथो गावात झाला. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सेरिंग यांचा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.