AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काका पक्ष सोडण्याच्या तयारीत, बहीण संसार मोडण्याच्या मार्गावर, लालूंच्या पक्षात करिष्मा राय दाखल

लालू प्रसाद यादव यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय हिची चुलत बहीण डॉ. करिष्माने राजदमध्ये प्रवेश केला. ऐश्वर्या आणि लालू यांचे धाकटे सुपुत्र तेज प्रताप यादव यांच्या घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे

काका पक्ष सोडण्याच्या तयारीत, बहीण संसार मोडण्याच्या मार्गावर, लालूंच्या पक्षात करिष्मा राय दाखल
| Updated on: Jul 02, 2020 | 5:35 PM
Share

पाटणा : बिहारमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्याआधीच पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या ‘राजद’ (राष्ट्रीय जनता दल) पक्षातील पाच आमदारांनी पक्ष सोडल्याचा प्रकार ताजा असतानाच दोन नवीन चेहरे पक्षात दाखलही झाले. त्यातील एक म्हणजे लालू यांच्या धाकट्या सुनेची बहीण डॉ. करिष्मा राय. (Lalu Prasad Yadav Estranged Daughter in Law Aishwarya Rai Cousin Karishma Rai enters RJD)

लालू प्रसाद यादव यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय हिची चुलत बहीण डॉ. करिष्माने राजदमध्ये प्रवेश केला. ऐश्वर्या म्हणजे लालू यांचे धाकटे सुपुत्र तेज प्रताप यादव यांची पत्नी. ऐश्वर्या आणि तेज प्रताप यांच्यातील संबंध लग्नानंतर काही दिवसातच बिघडले आणि घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. दोन परिवारांचे नातेसंबंध तुटलेले असताना ऐश्वर्याच्या बहिणीने राजकीय लागेबांधे जोडण्याचा प्रयत्न केल्याने ‘राजकारणात काहीही होऊ शकतं’ या उक्तीचा प्रत्यय येतो.

दरम्यान, करिष्मा राजदमध्ये सामील होत आहे, याबद्दल मला माहिती देण्यात आली नव्हती. चंद्रिका राय यांच्या कुटुंबाचा मी नेहमीच विरोध करत आलो आहे. ज्याने माझे आयुष्य बरबाद केले, अशा कुटुंबातील सदस्यावर माझा विश्वास नाही. हा निर्णय पक्षाने घाईघाईने घेतला आहे, अशी प्रतिक्रिया तेज प्रताप यांनी ट्विटरवर दिली आहे.

हेही वाचा : बिहारच्या राजकारणात खळबळ, लालूंना एकाच दिवशी तीन धक्के, आधी पाच आमदारांचा राजीनामा, मग…

विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांना स्वत: करिष्मा यांना सदस्यत्व दिले असून करिष्मा यांच्या प्रवेशामुळे पक्ष बळकट होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र नंतर तेजस्वी यादव यांनी आपले ट्विट डिलीट केले.

करिष्मा राय ही ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय यांचे मोठे बंधू विधान राय यांची कन्या. चंद्रिका राय हे राजदचे नेते. मात्र यादव कुटुंबावर नाराजी ओढवल्याने त्यांनी पक्ष सोडण्याचा पवित्रा घेतला आहे. ते एनडीएच्या मार्गावर असल्याचे बोलले जाते. काका पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, चुलत बहीण संसार मोडण्याच्या मार्गावर आहे, अशातच करिष्माने हा रस्ता निवडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

“मी आमचे आजोबा स्वर्गीय प्रसाद राय यांच्या कार्याने प्रेरित आहे. मला इतरांसाठीही काहीतरी करायचे आहे. माझ्यासारख्या सुशिक्षित आणि सक्षम लोकांनी ते केले नाही तर कोण करणार? मला वाटते की समाजाबद्दल माझे मोठे दायित्व आहे आणि आता मी ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे, मला राजकारणात भरपूर वाव मिळेल” अशी अपेक्षा करिष्मा राय यांनी व्यक्त केली.

“माझ्या आजोबांनी वंचित, शोषित लोकांसाठी बरीच कामे केली आहेत. लालू प्रसाद यादव यांनी त्यांचेच कार्य पुढे नेले. म्हणून राजकारणात उतरताना मी राजदची निवड केली. मी निवडणूक लढवायची की नाही, असल्यास कुठून, याचा निर्णय लालू यादव घेतील” असं करिष्मा राय यांनी सांगितलं. (Lalu Prasad Yadav Estranged Daughter in Law Aishwarya Rai Cousin Karishma Rai enters RJD)

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.