LIVE: पंतप्रधान मोदी पुण्यात, पुणेरी पगडीने स्वागत

सचिन पाटील

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याणमध्ये दोन मेट्रो मार्गाचं भूमीपूजन करण्यात आलं. रिमोटचं बटण दाबून मोदींनी या मेट्रो प्रकल्पाला सुरुवात केली. याशिवाय सिडकोकडून निर्मिती होत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 90 हजार घरांच्या भूमीपूजनाही पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. ठाणे- भिवंडी-कल्याण आणि दहीसर-मिरा भाईंदर या दोन मेट्रो मार्गाचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र  मोदी […]

LIVE: पंतप्रधान मोदी पुण्यात, पुणेरी पगडीने स्वागत

मुंबई:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याणमध्ये दोन मेट्रो मार्गाचं भूमीपूजन करण्यात आलं. रिमोटचं बटण दाबून मोदींनी या मेट्रो प्रकल्पाला सुरुवात केली. याशिवाय सिडकोकडून निर्मिती होत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 90 हजार घरांच्या भूमीपूजनाही पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं. ठाणे- भिवंडी-कल्याण आणि दहीसर-मिरा भाईंदर या दोन मेट्रो मार्गाचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र  मोदी पुण्यात दाखल झाले. पुण्यातही मोदी मेट्रो मार्गाचं भूमिपूजन करणार आहेत.

पुणे लाईव्ह अपडेट

पुण्यात 2019 पर्यंत पहिली मेट्रो धावणार, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या भूमिपूजनवेळी पंतप्रधान मोदींचं आश्वासन, मोदींचा पुणेरी पगडीने सन्मान, पुणे देशातील सर्वोत्तम शहर बनेल, मुख्यमंत्र्यांना विश्वास

पुण्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये इलेट्रिक बसेस येणाऱ्या दिवसात  चालतील

लवकर ग्रीन बसेसही पुण्यात धावतील – सीएम

देशात सर्वात जास्त स्मार्ट सिटीचे कामं पुण्यात सुरू आहेत – सीएम

येणाऱ्या दिवसात पुण्याचं चित्र बदलणार – सीएम

मोदी पुणे मेट्रो फेजचे तीनचे रिमोटने भूमिपूजन केले

कल्याण LIVE UPDATE

-काँग्रेस सरकारपेक्षा जास्त घरं आमच्या सरकारने बनवली आहेत, आतापर्यंत एक कोटीपेक्षा अधिक घरं आम्ही बनवली आहेत, काँग्रेसवर मोदींची टीका

-प्रत्येकाला घरं देणं हे आमचं ध्येय, पंतप्रधान योजनेअंतर्गत अडीच लाखाची मदत दिली जाते, त्यामुळे तुमचं कर्ज एकदम अडीच लाखाने कमी होतं – नरेंद्र मोदी

-मुंबई स्वप्न साकार करणारी नगरी, 8 वर्षापूर्वी मुंबईत मेट्रो सुरू झाली, 8 वर्षात फक्त 11 किलो मीटर मेट्रो पूर्ण झाली, 2022 ते 2024 पर्यंत आम्ही पावणे 300 किमी मेट्रो पूर्ण करु – नरेंद्र मोदी

-काँग्रेसच्या काळात 8 वर्षात केवळ 11 किमीची मेट्रो सुरु झाली, मात्र आम्ही येत्या काळात शेकडो किमी मेट्रोचं जाळं उभं करु

-मुंबई-ठाण्यातील पायाभूत सुविधांवर आम्ही भर दिलाय, मेट्रोचं भूमीपूजन त्याचाच एक भाग आहे, मेट्रोमुळे मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला फायदा होईल

-गाव-खेड्यातून आलेल्या प्रत्येकाला मुंबई-ठाण्यात नवी ओळख मिळाली, मुंबईने सर्वांना सामावून घेतलं

-मुंबई-ठाण्याने देशाला सामावून घेतलं, इथे देशाच्या विविधतेची एकता पाहायला मिळते- नरेंद्र मोदी

-छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला वंदन, महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज यांना वंदन

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरांसह मान्यवरांनी मोदींचं मुंबई विमानतळावर स्वागत केलं. मुंबई दौऱ्यावर मोदी अनेक विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. ठाणे-कल्याण मेट्रो मार्ग 5 आणि दहिसर पूर्व ते मिरा भाईंदर मेट्रो मार्ग 9 चे भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. दुपारी 2.30 वाजता कल्याण येथील फडके मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

ठाणे-कल्याण मेट्रो मार्ग, दहिसर मेट्रो मार्ग यासोबतच सिडकोतर्फे बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजनेच्या उद्घाटन समारंभासाठी मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार तसेच कल्याणच्या महापौर यांनाही निमंत्रित करण्यात आलं आहे. मोदी येणार असल्याने मागील एका आठवड्यापासून कल्याण शहरात जोरदार तयारी सुरु होती.

कसा असेल मोदींचा दौरा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (18 डिसेंबर) सिडकोतर्फे बांधण्यात येणाऱ्या 89 हजार 771 घरांच्या भव्य गृहनिर्माण योजनेचा शुभारंभ होणार आहे. या योजनेस पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्ग 5 आणि दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्ग 9 चे भूमीपूजन देखील पंतप्रधान करतील. कल्याणच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर दुपारी 2.30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोने 89 हजार 771 घरांच्या भव्यगृहनिर्माण योजनेचा प्रकल्प हाती घेतला आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील तळोजासह अन्य नोडमधील बस तसेच ट्रक टर्मिनल आणि रेल्वे स्थानकांजवळच्या परिसरात घरे बांधण्यात येतील. महागृहनिर्माण योजना-ऑगस्ट 2018 चा शुभारंभ करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरबांधणीसाठी ‘ट्रान्झिट ओरिएन्टेड डेव्हलपमेन्ट’ धोरणावर भर देण्याचे आवाहन केले होते.

सिडकोच्या इतिहासातील सर्वांत मोठा गृहनिर्माण प्रकल्प

सदर गृहनिर्माण योजनेतील 89 हजार 771 घरांपैकी 53, 493 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तर 36, 288 घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. सदर योजनेस पंतप्रधान आवास योजने अंतर्गत मंजुरी मिळाली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील लाभार्थी हे 2.5 लाख रुपये तर अल्प उत्पन्न गटातील लाभार्थी हे सीएलएसएस (Credit Linked Subsidy Scheme) अंतर्गत  2.67 लाख रुपये अनुदानास पात्र असतील. सदर गृहनिर्माण प्रकल्पासाठीचा अंदाजित खर्च 18 हजार कोटी रुपये इतका आहे. सिडकोच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा गृहनिर्माण प्रकल्प ठरणार आहे.

रेल्वे स्थानकांतील फोरकोर्ट एरिया, ट्रक व आंतरराज्य बस टर्मिनल इमारतींवरील मोकळ्या जागा तसेच रेल्वे स्थानकांजवळचे भूखंड यांचा वापर करून तेथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी घरे बांधावीत अशा प्रकारची नाविण्यपूर्ण कल्पना सिडकोतर्फे मांडण्यात आली आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाचे उद्घाटन

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो 5 मार्गाचे देखील भूमिपूजन करण्यात येणार आहे. एकंदर 17 एलिव्हेटेड स्थानके असणाऱ्या या मेट्रोची या परिसरातील नागरिकांना प्रतिक्षा आहे. यासाठी भिवंडीतल्या कोनगाव येथे मेट्रो डेपो प्रस्तावित आहे. कल्याण कृषी बाजार समिती ते कापूरबावडी असा हा 24.5 किमीचा मार्ग आहे. यासाठी 8 हजार 417 कोटी खर्च अपेक्षित आहे. मेट्रो 9 हा मार्ग दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर असा 10 किमीचा असून या मार्गात 8 एलिव्हेटेड स्थानके असतील. यासाठी 6 हजार 607 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वर्ष 2022 मध्ये तो पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI