राहुलने सांगितल्यास वाराणसीतूनही लढेन : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहे. नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात नुकतचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्यास वाराणसीतून निवडणूक लढवेन असे वक्तव्य प्रियांका गांधी यांनी केलं आहे. …

राहुलने सांगितल्यास वाराणसीतूनही लढेन : प्रियांका गांधी

नवी दिल्ली : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसी मतदारसंघातून भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत आहे. नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या वाराणसीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात नुकतचं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्यास वाराणसीतून निवडणूक लढवेन असे वक्तव्य प्रियांका गांधी यांनी केलं आहे.

लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरु आहे. वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. मात्र या मतदारसंघातून काँग्रेसकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका गांधी वाराणसीतून निवडणूक लढत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काँग्रेसकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मात्र नुकत्याच झालेल्या एका प्रचारसभेदरम्यान पत्रकारांनी प्रियांका यांना तुम्ही वाराणसीतून निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी उत्तर देताना प्रियांका यांनी  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्यास वाराणसीतून निवडणूक लढवेन असे सांगितले. तसेच वाराणसीत नरेंद्र मोदी यांच्याशी स्पर्धा करण्यास निश्चितच आनंद मिळेल असेही प्रियांका गांधी यांनी सांगितले.

वाराणसी येथे शेवटच्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. या मतदारसंघासाठी भाजपकडून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. येत्या 26 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी भाजपकडून रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह इतर भाजप नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या निवडणुकीसाठी त्यांना टक्कर देण्यासाठी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनीही वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले होते.

दरम्यान जर काँग्रेसकडून प्रियांका गांधी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली तर प्रियांका गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी अशा थेट सामना रंगणार आहे. त्यामुळे वाराणसी लोकसभा मतदारसंघात यंदाची लढत चुरशीची ठरणार आहे.

कोण आहेत प्रियांका गांधी?

प्रियांका गांधी या भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची नात, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कन्या आहेत. प्रियांका यांच्या आई म्हणजे सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत, तर भाऊ राहुल गांधी हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

गांधी कुटुंब भारताच्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनच राजकारण आणि समाजकारणात सक्रीय राहिलं आहे. प्रियांका गांधी यांच्या आजीचे वडील म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बहुमोल योगदान दिलं, तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर आधुनिक भारताची घडी बसवण्यातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. आता याच कुटुंबातील नवी पिढी म्हणजे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या राजकारणात सक्रीय झाले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *