प्रचाराचा ‘सुपरसंडे’, राज्यात मोदींच्या दोन, तर अमित शाहांच्या 4 प्रचारसभा, राहुल गांधी मुंबईत

विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने (Assembly Election Campaigning) कामाला लागले आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

प्रचाराचा 'सुपरसंडे', राज्यात मोदींच्या दोन, तर अमित शाहांच्या 4 प्रचारसभा, राहुल गांधी मुंबईत

मुंबई : विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोमाने (Assembly Election Campaigning) कामाला लागले आहे. सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रचारसभेच्या निमित्ताने सर्वच राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप केले जात (Assembly Election Campaigning)  आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या पार्श्वभूमीवर सकाळी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात मॉर्निंग वॉक केला. या मॉर्निंग वॉकदरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपला मतदान करण्याचे आवाहन (Assembly Election Campaigning) केले.

‘मुंबई चाले भाजपासोबत’ असे या मॉर्निंग वॉकच्या कार्यक्रमाचे नाव होते. मुख्यमंत्र्यांसोबत कुलाबा विधानसभेचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपचे अनेक कार्यकर्ते  यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सकाळी 7 च्या सुमारास कार्यकर्त्यांसोबत मॉर्निंग वॉक करत मतदारांना मतदानाचे आवाहन केले.

फक्त मरीन ड्राईव्ह नाही तर मुंबईतील अन्य भागातही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मॉर्निंग वॉक करत लोकांच्या भेटी घेतल्या. शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनीही वांद्रे पश्चिम मतदारसंघात लोकांशी संवाद साधला. नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी चारकोप भागात मॉर्निंग वॉक केला. तर कांदिवली पूर्व मतदारसंघात भाजपाचे अतुल भातखळकर यांनी मॉर्निंग वॉक करत जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभांचा झंझावात सुरू आहे. रविवारच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राहुल गांधी या नेत्यांच्या प्रचारसभांचे आयोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जळगाव आणि भंडारा जिल्हात सभा घेणार आहेत. सकाळी 11 वाजता जळगावमधील जामनेर रोडवर मोदींची सभा असेल. तर दुपारी 2.30 वाजता भंडाऱ्यातील साकोलीमध्ये दुसरी जनसभा असेल.

तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हेही आज 4 ठिकाणी प्रचारसभा घेणार आहे. सकाळी 11 च्या सुमारास कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचे दर्शन घेऊन ते या प्रचाराला सुरुवात करतील. त्यानंतर 11.15 च्या सुमारास तपोवन स्कूल मैदान परिसरात त्यांच्या एका जनसभा होईल.

यानंतर दुपारी 2 वाजता साताऱ्यातील कराड परिसरात छत्रपती शिवाजी स्टेडिअममध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आली आहे. संध्याकाळी 4 वाजता पुण्यातील शिरुर, संध्याकाळी 6 वाजता औरंगाबादेत सभेचे आयोजन केले आहे.

याशिवाय राहुल गांधींच्या राज्यात आज तीन सभांचे आयोजन केलं आहे. राहुल गांधी लातूरमधील औसा तर मुंबईत चांदिवली आणि धारावी अशा तीन ठिकाणी सभा घेणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही राज्यात चार सभा असणार आहे. यातीलअकोले, घनसावंगी, जामनेरसह, चाळीसगावात राष्ट्रवादीच्या सभा होणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांचे धडाका सुरु आहे. राज ठाकरे संध्याकाळी 6.30 वाजता दहिसरमध्ये जाहीर सभा घेणार आहे. तर त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईतील मालाड पूर्व याठिकाणी राज ठाकरेंची दुसरी सभा होणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI