निवडणूक निकालाला दोन दिवस उलटले, अद्याप EVM विरोधात कोणाचाही चकार शब्द नाही!

विधानसभा निवडणुकीआधी, किंबहुना लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच ईव्हीएमविरोधात (no oppose to EVM)  विरोधकांनी रान उठवलं होतं.

निवडणूक निकालाला दोन दिवस उलटले, अद्याप EVM विरोधात कोणाचाही चकार शब्द नाही!
ईव्हीएम

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल ( Maharashtra Assembly election results 2019) जाहीर होऊन आता दोन दिवस उलटले आहेत. 24 ऑक्टोबर रोजी राज्यातील निकाल जाहीर ( Maharashtra Assembly election results 2019) झाला. मात्र अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने ईव्हीएमविरोधात (no oppose to EVM) चकार शब्दही काढलेला नाही. विधानसभा निवडणुकीआधी, किंबहुना लोकसभा निवडणुकीपूर्वीपासूनच ईव्हीएमविरोधात (no oppose to EVM)  विरोधकांनी रान उठवलं होतं. ईव्हीएमऐवजी जुन्हा पद्धतीने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मात्र निवडणूक आयोगाने सर्व मागण्या फेटाळत, ईव्हीएमवरच ठाम राहिलं.

ईव्हीएमविरोधात सर्वात आक्रमक आवाज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उठवला होता. राज ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. ईव्हीएमविरोधात देशव्यापी लढा उभारण्यासाठी राज ठाकरेंनी प्रयत्न केले. त्यासाठी ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.

ईव्हीएम हद्दपार होत नाही तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचीही तयारी राज ठाकरे यांनी केली होती. मात्र अन्य पक्षांनी साथ न दिल्याने त्यांनी तो निर्णय मागे घेतला.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तक्रारी

दरम्यान, ईव्हीएमविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीनेही तक्रारी केल्या होत्या. प्रत्यक्ष मतदानावेळी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रारी केल्या होत्या.

ईव्हीएम मशीनच्या परिसरात मोबाईल जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. हीच मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही केली होती.

अनिल गोटे रात्रभर स्ट्राँगरुमबाहेर झोपले

धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत, फेरफार होऊ नये म्हणून मतदानानंतर ते रात्रभर ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरुमच्या बाहेर झोपले होते. धुळ्यात अनिल गोटे यांचा पराभव झाला. मात्र गोटे यांनी मतदान झाल्यानंतर थेट evm मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनांमागे जात, ज्या ठिकाणी evm ठेवण्यात आले, तिथे स्वत: रात्रभर खडा पहारा दिला होता.

निवडणूक आयोगाचं चॅलेंज

दरम्यान, ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या राजकीय पक्षांना ईव्हीएम हॅक करुन देण्याचं आव्हान निवडणूक आयोगानेच दिलं होतं. ईव्हीएम हॅक केलं जाऊ शकत नाही. ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकत नाही, असं निवडणूक आयोगाने ठणकावून सांगितलं आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI