AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद’, ब्लँक फोटो ट्विट करत काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका

महाराष्ट्र काँग्रेसनं राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे दोन फोटो ट्विट केलेत. पण मोदींचं कॅप्शन असलेला फोटो चक्क ब्लँक म्हणजेच काळा ठेवण्यात आला आहे.

'ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद', ब्लँक फोटो ट्विट करत काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 3:48 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देणं टाळण्यासाठी कधी पत्रकार परिषद घेत नाहीत, अशी टीका काँग्रेसकडून (Congress) सातत्यानं केली जाते. आजही हाच धागा पकडून महाराष्ट्र काँग्रेसनं (Maharashtra Congress) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय. महाराष्ट्र काँग्रेसनं राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे दोन फोटो ट्विट केलेत. पण मोदींचं कॅप्शन असलेला फोटो चक्क ब्लँक म्हणजेच काळा ठेवण्यात आला आहे. (Maharashtra Congress criticizes PM Modi for not holding press conference by posting blank photo on Twitter)

काय म्हटलं आहे काँग्रेसच्या ट्विटमध्ये?

महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन फोटो ट्विट करण्यात आले आहेत. यातल्या पहिल्या फोटोत राहुल गांधी आहेत. या फोटोला राहुल गांधी पत्रकार परिषद घेताना असं कॅप्शन देण्यात आलंय. तर दुसऱ्या फोटोला नरेंद्र मोदी पत्रकार परिषद घेताना असं कॅप्शन देण्यात आलंय. पण दुसरं कॅप्शन असलेला फोटो ब्लँक ठेवण्यात आला आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कधी पत्रकार परिषदच घेतली नाही हे यातून सांगण्याचा काँग्रेसचा प्रयत्न याहे.

‘भाजप राहुल गांधींना घाबरतो’

हे फोटो ट्विट करताना काँग्रेसनं #BJPFearsRahulGandhi या हॅशटॅगचा वापर केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलसोबत अनेक अकाऊंट्सवरून हा हॅशटॅग वापरून ट्विट्स केले जात आहेत. राहुल गांधी सातत्यानं आक्रमकपणे भाजपाविरोधी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे भाजप राहुल गांधींना घाबरत आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

राहुल गांधी यांचं ‘ते’ ट्विट ट्विटरने हटवले

नांगल येथे एका मुलीवर बलात्कार झाला होता (Nangal Rape Case). या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांचा फोटो ट्विट केला होता. विनीत जिंदल या वकिलाने त्याला आक्षेप घेत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मुलीच्या आईवडिलांचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांची ओळख पटली आहे. त्यामुळे या प्रकरणी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, असं जिंदल यांनी तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर हे ट्विट हटवण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

‘बेस्ट’च्या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणतात, देशाला कंडक्टरसारखा पंतप्रधान पाहिजे, कारण….

मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान : नाना पटोले

… तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस ओबीसींना 30 टक्के जागा देणार; नाना पटोले यांची मोठी घोषणा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.