मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान : नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय खेलरत्न पुरस्काराच्या नावातून राजीव गांधी यांचं नाव हटवण्याच्या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलीय.

मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान : नाना पटोले
नाना पटोले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 1:23 PM

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय खेलरत्न पुरस्काराच्या नावातून राजीव गांधी यांचं नाव हटवण्याच्या निर्णयावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलीय. मोदी सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव हटवून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान असल्याचं म्हणत त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. तसेच भाजप गांधी परिवाराला घाबरत असल्याचंही ते म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, “भाजपला गांधी परिवाराची भीती वाटतेय. त्यामुळेच भाजपने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललंय. भाजपची ही मनोवृग्न वृत्ती आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान आहेत.”

“नानाच्या भानगडीत पडण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीवर लक्ष द्या”

“नानाच्या भानगडीत पडण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीवर लक्ष द्यावं. 28 ऑगस्टला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांची सभा व्हावी, ही राज्यभरातील नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे ही सभा होत आहे,” असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.

“पुरामुळे पडलेलं घर दुरुस्त करणे दीड लाख रुपयात शक्य नाही”

नाना पटोले म्हणाले, “पूरग्रस्तांसाठी जी मदत जाहीर झाली, त्यात सुधारणा व्हावी. शेतकऱ्यांना मदत वाढवून मिळावी. पुरामुळे पडलेलं घर दुरुस्त करणे दीड लाख रुपयात शक्य नाही. त्यामुळे जाहीर झालेली मदत पुरेशी नाही. ती मदत वाढवून मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय.”

हेही वाचा :

ओबीसींना वैद्यकीय प्रवेशात कशाच्या आधारे 27 टक्के आरक्षण दिलं?; नाना पटोलेंचा केंद्राला सवाल

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्ष संघटना बळकट करा : नाना पटोले

भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवणारेच भारतमातेला विकायला निघाले, नाना पटोलेंचा घणाघात

व्हिडीओ पाहा :

Nana Patole criticize PM Narendra Modi for renaming controversy

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.