LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट

LIVE : राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट
Picture

राजू शेट्टींना काँग्रेसची जागा

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला अखेर काँग्रेसकडून सांगलीची जागा, राजू शेट्टी आणि सांगलीतील काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु, बैठकीला राजू शेट्टी, सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रकाश आवाडे आणि मोहन कदम उपस्थित

15/03/2019
Picture

नाना नागपुरात

नागपूर : काँग्रेसचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्या स्वागतासाठी नागपूर रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांची गर्दी, थोड्याच वेळात नाना पटोले नागपूर रेल्वे स्टेशनवर येणार

15/03/2019
Picture

काँग्रेसचे उर्वरीत उमेदवार आज ठरणार

महाराष्ट्रातील उर्वरीत उमेदवारांच्या निवडीसाठी दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची आज बैठक, 14 उमेदवारांवर अंतिम चर्चा होणार, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाणांसह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार

15/03/2019
Picture

अमरावतीत युतीचा मेळावा

अमरावतीत आज शिवसेना-भाजप युतीचा विभागीय कार्यकर्ता मेळावा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 4 खासदार, 5 मंत्री, 35 आमदार हजेरी लावणार

15/03/2019
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *