AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांनी सोयीचं राजकारण केलं, जे झालं ते महाराष्ट्र पाहत आहे, दरेकरांची पवारांवर टीका

Maharashtra Political Crisis : काल दुपारपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरादार टीका करीत आहेत. थोड्यावेळ्यापूर्वी प्रवीण दरेकरांनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली आहे.

पवारांनी सोयीचं राजकारण केलं, जे झालं ते महाराष्ट्र पाहत आहे, दरेकरांची पवारांवर टीका
pravin drarekarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 03, 2023 | 1:42 PM
Share

महाराष्ट्र : भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा तीस आमदारांचा गट फोडल्यामुळे राजकारण (Maharashtra Political Crisis) मोठी खळबळ माजली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणात भूकंप होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. ती गोष्ट काल खरी ठरली असं म्हणायला हरकत नाही. काल राजकारणात तिसऱ्यांदा भूकंप झाल्यामुळे राजकीय नेते (Ajit pawar) एकमेकांवर जोरदार टीका करीत आहेत. प्रवीण दरेकरांनी शरद पवार (sharad pawar) यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. वसंत दादाच्या वेळेला लोकशाही वेगळी होती का? शरद पवार यांनी आजवर सोयीचे राजकारण आजवर केले आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला हिंदुत्व शिकायची गरज आहे असंही प्रवीण दरेकर (bjp leader pravin darekar) म्हणाले.

राष्ट्रवादीचा एक गट फुटल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. महाराष्ट्रात काल दुपारी सगळ्यांना धक्का बसला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर इतर नऊ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सुध्दा शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजपवरती अनेक नेत्यांनी जोरदार टीका केली. त्यावेळी टीकेला उत्तर देताना, प्रवीण दरेकर म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना “हिंदुत्व शिकायची गरज आहे, त्यांनी यावर बोलू नये. संजय राऊत ज्योतिषी आहेत का?,हवेत गोळीबार करायचा आणि त्यातून संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात”

काल महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा गट फुटल्यानंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष पवारांच्या भूमिकेकडं होतं. परंतु काल दुपारी पवारांनी मी या गोष्टीचं समर्थन करीत नाही असं सांगितलं. त्यानंतर पुन्हा राजकीय घडामो़डींना वेग आला होता. आज शरद पवारांनी कराडमध्ये प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. म्हणाले, सध्या जे भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे.

“अनेक राज्यात भाजपनं सरकारं फोडली आहेत. जिथं चांगला कारभार चालू होता. तिथं त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तसाचं प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. ज्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष फोडला आहे,” त्यांना सोडणार नाही अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.