AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधीमंडळात कोणत्या पक्षाचे किती आमदार धडकणार? पक्षनिहाय निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप 105, शिवसेना 56 जागांवर विजयी झाली. राष्ट्रवादीने 54, तर काँग्रेस 44 जागा जिंकल्या आहेत.

विधीमंडळात कोणत्या पक्षाचे किती आमदार धडकणार? पक्षनिहाय निकाल
| Updated on: Oct 25, 2019 | 8:22 AM
Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) भाजपने मुसंडी मारत 105 जागा मिळवल्या आहेत, मात्र 145 ची मॅजिक फिगर एकहाती गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला असला, तरी लोकसभा निवडणुकांच्या वेळी दिसलेली भाजप-शिवसेना महायुतीची लाट ओसरत चालल्याचं चित्र आहे. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर राष्ट्रवादीनेही कांटे की टक्कर देत 54 जागा जिंकल्या आहेत. प्रचारात फारशी चमक न दाखवता काँग्रेसने तब्बल 44 जागा खिशात घातल्या आहेत.

यंदाच्या निवडणुकीत बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांचा बोलबाला राहिला. तब्बल 13 अपक्ष आमदारांनी विधीमंडळ गाठलं आहे. त्यानंतर हितेंद्र ठाकूर यांच्या ‘बहुजन विकास आघाडी’ला 3 जागा मिळाल्या आहेत. प्रहार जनशक्ती, एमआयएम, समाजवादी पक्ष यांना प्रत्येकी दोन जागांवर यश मिळालं आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला जेमतेम भोपळा फोडता आला. मनसेची एक जागा निवडून आली आहे. माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष, शेकाप, रासप, स्वाभिमानी या सर्व पक्षांना एक-एक जागा जिंकता आली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 पक्षीय बलाबल (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result)

भाजप – 105 शिवसेना – 56 राष्ट्रवादी – 54 काँग्रेस – 44 बहुजन विकास आघाडी – 03 प्रहार जनशक्ती – 02 एमआयएम – 02 समाजवादी पक्ष – 02 मनसे – 01 माकप – 01 जनसुराज्य शक्ती – 01 क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01 शेकाप – 01 रासप – 01 स्वाभिमानी – 01 अपक्ष – 13

एकूण – 288

महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्यासारखे भाजपचे नेते विजयी झाले. मात्र पंकजा मुंडे, राम शिंदे यांच्यासारख्या बड्या मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला. एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसेही पराभूत झाल्या. ठाकरे घराण्यातून निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आदित्य ठाकरे वरळीतून जिंकून आले, मात्र ‘मातोश्री’ला अंगणात अर्थात वांद्रे पूर्व मतदारसंघातच पराभव स्वीकारावा लागला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर पराभूत झाले.

दोन तृतीयांश आयारामांना मतदारांनी घरी बसवलं!

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार एक लाख 65 हजारांच्या लीडने जिंकून आले. तर पवारांचे नातू रोहित पवार यांनीही बिग फाईट देत विजयश्री मिळवला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आर आर पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील पुन्हा विजयी झाल्या, तर नवाब मलिक यांनीही आमदारकी मिळवली.

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी प्रचारात फारसा रस घेतला नसतानाही पक्षाला बऱ्यापैकी जागा मिळवता आल्या. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रणिती शिंदे, दिलीप वळसे पाटील यांनी गड जिंकले. विलासराव देशमुखांचे दोन्ही पुत्र विधानसभेची पायरी चढत आहेत.

विरोधीपक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी मागणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेला केवळ एकच जागा जिंकता आली. कल्याणमध्ये राजू पाटील यांचा विजय झाला, मात्र संदीप देशपांडे, अविनाश जाधवांसारखे बिनीचे शिलेदार पराभूत झाले.

एमआयएमचा स्ट्राईक रेट कायम असल्याचं निकालात पाहायला मिळालं. मुंबई-औरंगाबादेतील जागा पक्षाने गमावल्या असल्या, तरी धुळे आणि मालेगावात एमआयएमचे आमदार निवडून आले आहेत.

आयाराम नेत्यांनाही मतदारांनी जागा दाखवली. संदीप क्षीरसागरांनी शिवसेनेत गेलेले काका जयदत्त क्षीरसागरांना धोबीपछाड दिली. हर्षवर्धन पाटील, दिलीप सोपल, दिलीप माने यांच्यासारखे दिग्गज आयाराम नेते पराभूत झाले. तर नितेश राणे, राधाकृष्ण विखे पाटील, भास्कर जाधव यासारख्या मोजक्या पक्षांतर केलेल्या आमदारांनाच यश आलं.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंना धक्का बसला. श्रीनिवास पाटील यांचा बलाढ्य विजय झाला. त्यामुळे सातारकरांचा मान छत्रपतींच्या गादीला असला, तरी मत राष्ट्रवादीला दिल्याचं स्पष्ट झालं.

2014 च्या तुलनेत काय फरक? (Maharashtra Vidhansabha Election Partywise Result) पक्ष – (वाढ/घट) <2014 मधील जागा>

भाजप – (-17) <122> • शिवसेना – (-7) <63> • काँग्रेस – (+2) <42> • राष्ट्रवादी – (+13) <41> • बविआ – (बदल नाही) <03> • शेकाप – (-2) <03> • एमआयएम – (बदल नाही) <02> • वंचित/भारिप – (-1) <01> • माकप – (बदल नाही) <01> • मनसे – (बदल नाही) <01> • रासप – (बदल नाही) <01> • सपा – (+1) <01> • अपक्ष – (+6) <07> • एकूण – 288

हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.