महासेनाआघाडीचा बुलेट ट्रेनला विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे?

‘महासेनाआघाडी’ सरकार सत्तेत आल्यानंतर कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार, याकडे जनतेचं लक्ष लागलं (congress ncp meeting discussion) आहे.

congress ncp meeting discussion, महासेनाआघाडीचा बुलेट ट्रेनला विरोध, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे?

नवी दिल्ली : राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगाने घडताना दिसत (congress ncp meeting discussion) आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येत महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक पार (congress ncp meeting discussion) पडली. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. ‘महासेनाआघाडी’ सरकार सत्तेत आल्यानंतर कोणत्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार, याकडे जनतेचं लक्ष लागलं (congress ncp meeting discussion) आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातमिळवणी करत महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकत्रित झालेल्या बैठकीत बुलेट ट्रेनला विरोध केला जाईल. तो पैसा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात येईल अशी चर्चा झाल्याचे समोर येत आहे.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे  (congress ncp meeting discussion) 

  1. सरकार स्थापन करत असताना किंवा सरकार चालवताना तिन्ही पक्षांचे समन्वय राखण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाईल.
  2. बुलेट ट्रेनला विरोध केला जाईल. तो पैसा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला जाईल.
  3. शिक्षित बेरोजगारांनी रोजगार देण्याबाबत

दरम्यान विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 28 दिवस उलटून गेले, तरीही सत्तास्थापन न झाल्यामुळे सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले सहा EXCLUSIVE मुद्दे लागले आहेत.

महासेनाआघाडीच्या किमान समान कार्यक्रमातले महत्त्वाचे मुद्दे (MahaSenaAghadi Common Minimum Program)

1. शेतकऱ्यांची कर्जमाफी, सातबारा कोरा करणार ही शिवसेनेची भूमिका

2. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पात वेगानं काम करण्याचा विचार

3. राज्य सरकारची वित्तीय तूट कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन

4. सावकारी कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता

5. विजेच्या दरात कपात

6. रोजगाराची संख्या वाढवणे, जास्तीत जास्त रोजगार द्यायचा प्रयत्न

उद्या सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय?

बुधवारी (20 नोव्हेंबर) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साडेपाच तासांच्या बैठकीनंतर आज पुन्हा एकदा काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक झाली. या बैठकीपूर्वी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आणि नंतर एकत्र बैठक झाली. दरम्यान उद्या सकाळी 11 वाजता मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादीच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी ही बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मित्रपक्षांशी आघाडी चर्चा करणार आहे. त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेना नेत्यांसोबत बैठक होईल. त्यामुळे आता मुंबईत सत्तास्थापनेच्या वाटाघाटी सुरु होणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *