AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारे व्हिडीओ..

CJP Protest Delhi : कॉकरोच जनता पार्टीचे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, रात्री यादरम्यान धक्कादायक घटना घडली. थेट पोलिसांवर हल्ला चढवण्यात आला.

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारे व्हिडीओ..
Delhi Police attack
| Updated on: Jul 23, 2026 | 9:27 AM
Share

CJP Protest Delhi : गेल्या महिनाभरापासून जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळलं. त्यानंतर अभिजीत दिपके यांनी थेट संसदेवर मोर्चा काढला. त्यांचा हा मोर्चा संसद परिसरापर्यंत पोहोचू शकला. त्यानंतर आंदोलन चिघळले. मोर्चानंतरही आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. देशातील विरोधी पक्षातील नेते आंदोलकांची भेट घेत आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम आहेत. मात्र, सरकारकडून कोणत्याही प्रकारची पाऊले धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल उचलली जात नाहीत. पावसापाण्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सोमवारी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. धर्मेंद्र प्रधान यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली. विद्यार्थ्यांवर कारवाई करू नका, अशा संदेश देणारा व्हिडीओ सोनम वांगचुक यांच्याकडून शेअर करण्यात आला.

यादरम्यानच जंतर मंतरवरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. रात्री सुमारे साडेआठ वाजता, दिल्लीच्या कनॉट प्लेसमधील टॉल्स्टॉय मार्गाजवळ,आंदोलक असल्याचे भासवणाऱ्या समाजकंटकांनी पुन्हा एकदा पोलिसांवर हल्ला केला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जमावाने अचानक दगड आणि बाटल्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. ज्यात कनॉट प्लेसचे एसीपी विवेक भगत जखमी झाल्याची माहिती आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना स्वतः आरएमएल रुग्णालयात नेले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही मिनिटे परिस्थिती तणावपूर्ण होती. थेट पोलिसांवर हल्ला चढवल्याने खळबळ उडाली. संध्याकाळ होताच जमावाने अचानक पोलीस आणि प्रसारमाध्यमांवर हल्ला केला. यामुळे काही काळ तणाव वाढला.

जंतर मंतर येथील परिस्थिती शांत आहे. पोलिसांवरील हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पोलिसांच्या अंगावर जाताना हे मुले दिसत आहेत. तोंडाला रूमाल बांधून काहीजण पोलिसांना मारहाण करत आहेत. जमाव अधिक आहे आणि पोलिसांची संख्या कमी व्हिडीओमध्ये दिसत आहे. रिंगण करून पोलिसांना जमावाकडून घेरले जात आहे. पोलिसांवर दगड फेकली जात असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण.

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण