Video | फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे!, वाचा गडकरींचे भन्नाट फटके आणि आयडिया

फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना जोरदार चिमटे काढले. | Nitin Gadkari

Video | फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे!, वाचा गडकरींचे भन्नाट फटके आणि आयडिया
नितीन गडकरी रस्ते सुरक्षा कार्यक्रमात बोलताना
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 3:45 PM

नागपूर :  फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना जोरदार चिमटे काढले. कुणालाही आता फुकटंच देणार नाही. काहीतरी देण्यासाठी एक रुपया तरी घेणारच, असं गडकरी म्हणाले. (Minister Nitin Gadkari Sadak Suraksha Karyakram)

नितीन गडकरी यांनी नागपूरच्या रस्ते सुरक्षा कार्यक्रमात बोलताना तुफान फटकेबाजी केली. लोकांना आतापर्यंत फुकटचं घ्यायची सवय लागलीय. आम्हीही आतापर्यंत द्यायचो. पण  फुकटचं दिलं तर लोकांना वाटते गडकरींजवळ खूप हरामचा माल आहे. म्हणून आता कुणालाही फुकटंच देणार नाही, असं गडकरी म्हणाले.

आता फुकट काहीच देणार नाही

गीर गायीचं व्यावसायिक महत्त्व गडकरींनी पटवून दिलं. गीर गाय ब्राझीलमध्ये 62 लीटर दूध देते. त्या गाईंचं वीर्य भारतात आणण्यात आलंय. यावर संशोधन सुरु झालं. नागपुरात त्याची प्रयोगशाळा आहे. गाईच्या शेणापासून पेंट तयार होईल. तसंच गाईचं शेण 5 रुपये किलो दराने विकलं जाणार आहे. या सगळ्यावर एक फिल्म तयार केलीय. पण लोकांना ही फिल्म फुकटात दाखवणार नाही. चित्रपट दाखवायचा एक रुपया तरी घेणार नाहीतर माझ्याजवळ हरामचा माल आहे, अशी लोकांची धारणा व्हायची, असं गडकरी म्हणाले.

देशातली 30 टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बोगस

आपल्या देशात ड्रायव्हिंग लायसनस सहज मिळते. देशात 30 टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बोगस निघाले, असं गडकरी म्हणाले. रस्त्यात वाहनं उभी केल्यास, त्याचा मोबाईल फोटो पाठवायला सांगणार. त्याचा अर्धा दंड फोटो काढणाऱ्याला आणि अर्धा दंड सरकारला देणार, असंही गडकरी म्हणाले. नागपुरातील अपघाताचे 61 पैकी 31 ब्लॅक स्पॅाट सुधारण्यात आले आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.

गडकरींच्या साथीने मकरंद अनासपुरेंची जोरदार बॅटिंग

गेल्या १० वर्षात रस्त्याची स्थिती पाहिली तर आनंद होतो. गडकरींनी देशाच्या रस्ते विकासात सिंहाचा उचलला आहे. म्हणून गडकरी यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढतो, अशा भावना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी बोवून दाखवल्या.

शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याचं मोठं आव्हान असतं. रस्ता वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी. वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांना दंड वाढवायला हवा. युद्ध किंवा महामारीपेक्षा जास्त लोक अपघातात मरतात, असंही अनासपुरे म्हणाले. तसंच भ्रष्टाचारावर बोलताना अनासपुरे यांनी एकदम कडक सल्ला दिला. लाच घेणाऱ्यांकडून ५०० पट दंड घ्या, लाच घेणं बंद होईल, असं ते म्हणाले.

(Minister Nitin Gadkari Sadak Suraksha Karyakram)

हे ही वाचा :

Nitin Gadkari | मोदींनी आंदोलनजीवी म्हणून डिवचल्यानंतर नितीन गडकरींचा जुना व्हिडीओ व्हायरल

अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन
गुलाबी शाल, बुके अन्..दादांकडे बीडच पालकमंत्रीपद, पंकजाताईकडून अभिनंदन.
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज
सैफ आता सेफ! चाकू हल्ल्यानंतर अभिनेत्याला 6 दिवस उपचारानंतर डिस्चार्ज.
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये
BEED : खंडणीची मागणी, तो CCTVपाहिला? कराडसह सर्व आरोपी एका फ्रेममध्ये.
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्...
बीडमध्ये चालंलय काय? मुलीचा HIV ने मृत्यू झाल्याची अफवा अन्....
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत..
दावोस दौऱ्यात चिमुकल्याकडून देवाभाऊंचं कौतुक, पुन्हा येईन म्हटलं होत...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच...
पुण्यात दुर्मीळ आजार; दरवर्षी १ लाखांत एक बाधित, 'ही' लक्षणं दिसताच....
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?
बीडच्या 13 सरपंच, 418 सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका, कारण नेमक काय?.
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर
एकनाथ शिंदे पुन्हा का नाराज? दरे गावाला का गेले?; मोठं कारण आलं समोर.