AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरुणाला उडवलं, जागीच मृत्यू, जमावाने गाडी फोडली

राज्याचे जलसंधारण मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. तानाजी सावंत (Tanaji Sawant)  यांच्या गाडीने एका उडवल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरुणाला उडवलं, जागीच मृत्यू, जमावाने गाडी फोडली
| Updated on: Sep 30, 2019 | 11:26 AM
Share

सोलापूर : राज्याचे जलसंधारण मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant car accident) हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant car accident)  यांच्या गाडीने एका उडवल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने तानाजी सावंतांची गाडी फोडली.  सोमवारी सकाळी ही घटना घडली.

श्यामकुमार देवीदास व्हळे, असं अपघातात मृत्यू झालेल्या 45 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.

घटनास्थळावरुन प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शीजवळ हा अपघात झाला, त्यावेळी मंत्रिमहोदय गाडीतच उपस्थित होते, असा दावा स्थानिकांचा आहे. मात्र मंत्रिमहोदयांनी टीव्ही 9 ला दिलेल्या प्रतिक्रियेत आपण मुंबईत असल्याचं सांगितलं.

दरम्यान, संतप्त जमावाने गाडीची तोडफोड करुन, तानाजी सावंतांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांच्या माहितीनुसार,  श्यामचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी जवळच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया

मी सध्या मुंबईत आहे, या अपघाताची माहिती मी घेत आहे, अशी प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी टीव्ही 9 मराठीला दिली. त्यामुळे तानाजी सावंत हे अपघाताच्या गाडीत होते की नव्हते याबाबत अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही.

खेकडा प्रकरणामुळे चर्चेत

मंत्री तानाजी सावंत हे रत्नागिरीतील तिवरे धरण फुटल्यानंतर त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. “गेल्या 15 वर्षात धरणाला काही झालेलं नाही. धरणात खेकड्यांनी घर केल्यामुळे धरणाला गळती लागली. धरणाचं काम निकृष्ठ नव्हतं, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं.  तिवरे धरणफुटी ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही  दुर्घटना होती. गावकरी आणि अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरलं, त्यामुळेच ते फुटलं “असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता, त्यामुळे ते टीकेचे धनी बनले होते.

हंसराज अहिरांच्या गाडीला अपघात, दोन पोलिसांचा मृत्यू

दरम्यान, चार दिवसापूर्वी माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला झालेल्या अपघातात (Hansraj Ahir Convoy Car Accident) दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत. या अपघातातून हंसराज अहिर सुखरुप वाचले आहेत. हंसराज अहिर चंद्रपूरहून नागपूरला जात होते. त्यावेळी वर्ध्यातील जाम चौरस्त्याजवळ कांडळी नदी पार केल्यानंतर हा अपघात झाला. सुरक्षा वाहन ट्रकवर आदळल्यामुळे गाडीचा चेंदामेंदा (Hansraj Ahir Convoy Car Accident) झाला.

संबंधित बातम्या 

माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, पोलिस आणि सीआरपीएफ जवानाचा मृत्यू  

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.