AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सरनाईक, वायकर हा तर मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये!’, ईडी कारवाईवरुन आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

प्रताप सरनाईक आणि रविंद्र वायकर हा एक मुखवटा झाला. त्याचा मागचा कलाकार जो आहे तो कलानगरमध्ये बसला आहे", अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

'सरनाईक, वायकर हा तर मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये!', ईडी कारवाईवरुन आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
| Edited By: | Updated on: Nov 24, 2020 | 2:43 PM
Share

सिंधुदुर्ग: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं छापेमारी सुरु केली आहे. सरनाईक यांच्या दोन्ही पुत्रांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईवरुन शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिवसेनेच्या आरोपांना भाजपकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यानंतर आमदार नितेश राणे यांनीही सरनाईकांवर झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.(MLA Nitesh Rane and Nilesh Rane make serious allegations against Chief Minister Uddhav Thackeray)

“मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचं भुयारी गटार कलानगरकडे जातं. ईडीचा तपास अजून खोलवर झाला तर बरोबर कलानगरमध्ये पोहोचतील. चुकीचं काही झालं असेल म्हणूनच ईडीने कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक आणि रविंद्र वायकर हा एक मुखवटा झाला. त्याचा मागचा कलाकार जो आहे तो कलानगरमध्ये बसला आहे”, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेवर जोरदार प्रहार केलाय. “ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल आपल्याला बरीच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं विद्यापीठ आहे. बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार ठाणे शहर आणि जिल्ह्यात चालतात. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत”, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत, राणेंचा टोला

जप खासदार नारायण राणे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, मात्र सरनाईक काय साधू संत नाहीत, असा टोला राणेंना लगावला. “कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचं नसतं. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ” असं नारायण राणे म्हणाले.

किरीट सोमय्यांकडून कारवाईचं समर्थन

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा खोटी कमा केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले.

मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई नको, असं म्हणणं योग्य नाही, ही चुकीची लोकशाही होणार. म्हणून लोकशाहीत फुल होमवर्कसह कारवाई होत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

शिवसेनेचे मुखियाही असेच उद्योग-धंदे करतात हे सर्वांना माहीत, किरीट सोमय्यांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला

प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत, सरनाईकांच्या घरावर ईडीच्या छापेमारीनंतर राणेंचा टोला

‘ईडी’ने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली!, सरनाईकांच्या घरावरील छापेमारीवर संजय राऊतांचा टोला

MLA Nitesh Rane and Nilesh Rane make serious allegations against Chief Minister Uddhav Thackeray

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.