शरद पवारांचे आभार, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा : आमदार संजय शिंदे

करमाळा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde supports Devendra Fadnavis) यांनी भाजपला पाठिंबा दिला असला, तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत.

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर 
  • Published On - 15:06 PM, 4 Nov 2019
शरद पवारांचे आभार, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा : आमदार संजय शिंदे

सोलापूर : करमाळा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde supports Devendra Fadnavis) यांनी भाजपला पाठिंबा दिला असला, तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले आहेत. “शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत मला पाठींबा दिला होता. त्यामुळे त्यांचे मी आभार मानले आहेत. मात्र पवारसाहेबांनी (Sanjay Shinde supports Devendra Fadnavis) सरकार स्थापन न करता विरोधात बसण्याची भूमिका जाहीर केली. करमाळा तालुका विकासाच्या दृष्टीने मागे आहे. तालुक्याच्या विकासासाठी सत्तेत राहणे आवश्यक आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला” असं करमाळ्याचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितलं.

संजय शिंदे हे विजयी झाल्यानंतर प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी क्रेनच्या सहाय्याने आमदार संजय शिंदे याचं जोरदार स्वागत करण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच संजय शिंदे अध्यक्षपदी असताना आमदार झाले आहेत.

संजय शिंदेनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार रश्मी बागल आणि आमदार नारायण पाटील यांचा पराभव केला. संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे घेऊन जाहीर पाठींबा दिला होता. मात्र सत्तेबरोबर राहण्यासाठी आपण राष्ट्रवादीऐवजी मुख्यमंत्र्यांना पाठींबा दिल्याच शिंदेनी म्हटलं आहे.