अमरावती शिक्षक मतदारसंघ : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवाराची सरशी, माजी कृषीमंत्र्यांच्या बहिणीलाही भाजपपेक्षा अधिक मतं

अमरावती शिक्षक मतदारसंघ : पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवाराची सरशी, माजी कृषीमंत्र्यांच्या बहिणीलाही भाजपपेक्षा अधिक मतं

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 3 हजार 131 मतं मिळवून आघाडीवर आहेत.

अनिश बेंद्रे

|

Dec 03, 2020 | 4:40 PM

अमरावती : विधानपरिषदेवरील अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजप उमेदवार नितीन धांडे पिछाडीवर असून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी 831 मतांनी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे भाजप नेते आणि कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे यांनीही पहिल्या फेरीत भाजप उमेदवारापेक्षा अधिक मतं मिळवली आहेत. (MLC Amravati Teacher Constituency Election Result Live Update)

अमरावती शिक्षक मतदारसंघात एकूण 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेकडून विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजप उमेदवार नितीन धांडे, भाजप नेते अनिल बोंडे यांच्या अपक्ष रिंगणात उतरलेल्या बहीण संगीता शिंदे यांचे आव्हान आहे. त्यामुळे अनिल बोंडे आपल्या पक्षाशी प्रामाणिक राहतील की एकुलत्या एका बहिणीला मदत करणार, असा प्रश्न आधीपासूनच विचारला जात होता.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 3 हजार 131 मतं मिळवून आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना 2300, तर शिक्षक आघाडीचे उमेदवार शेखर भोयर यांना 2078 मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार संगीता शिंदे यांना 1304, तर भाजप उमेदवार नितीन धांडे यांना 666 मतं मिळाली आहेत. मात्र पुढील फेऱ्यांमध्ये हे चित्र बदलू शकते.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल रात्री 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास लागण्याची शक्यता आहे. पहिल्या क्रमांकाचा विजेता कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीची मतमोजणी होणार आहे. पहिल्या राउंडमध्ये 13 हजार 999 मतांपैकी 13 हजार 511 मते वैध, तर 488 मते अवैध ठरली.

अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणूक

पहिल्या फेरीचा निकाल

पहिल्या राउंडमध्ये13 हजार 999 मतांपैकी
13 हजार 511 मतं वैध
488 मतं अवैध

14 टेबलांवर मतमोजणी, पहिल्या फेरीत प्रत्येक टेबलवर 1000 मतांचा गठ्ठा

पहिल्या फेरीतील मतांची आकडेवारी

डॉ. नितीन धांडे (भाजप) – 666
श्रीकांत देशपांडे (शिवसेना, महाविकास आघाडी) – 2300
अनिल काळे – 12
दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती संघटना)- 151
अभिजित देशमुख – 09
अरविंद तट्टे – 13
अविनाश बोर्डे – 1174
आलम तनवीर – 09
संजय आसोले – 30
उपेंद्र पाटील – 21
प्रकाश कालबांडे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ) – 437
सतीश काळे – 78
निलेश गावंडे – 1183
महेश डावरे – 141
(MLC Amravati Teacher Constituency Election Result Live Update)
दिपंकर तेलगोटे – 06
डॉ. प्रवीण विधळे – 07
राजकुमार बोनकिले – 348
शेखर भोयर (शिक्षक महासंघ) – 2078
डॉ. मुश्ताक अहमद -08
विनोद मेश्राम – 07
मो. शकील – 14
शरद हिंगे – 25
श्रीकृष्ण ठाकरे – 10
किरण सरनाईक (अपक्ष) – 3131
विकास सावरकर – 314
सुनील पवार – 35
संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) – 1304

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने गेल्या दहा वर्षांपासून शेखर भोयर आणि संगीता शिंदे सातत्याने काम करताना दिसत आहेत. श्रीकांत देशपांडे यांच्याबद्दल मात्र शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर त्यांच्या कार्यकाळात दिसून आला.

शेखर भोयर हे शिक्षक महासंघाकडून निवडणूक लढवत आहेत. शेखर भोयर हे मागील निवडणुकीत पराभूत झाले असूनही त्यांनी काम सुरुच ठेवले. एकीकडे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर शिक्षकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. तर नितीन धांडे आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांची बहीण संगीता शिंदे यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती, परंतु पक्षाने धांडेंना तिकीट दिलं. आता देशपांडे गड राखणार, भाजप हिरावून घेणार की दोघांच्या वादात तिसरा बाजी मारणार, याची उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या :

भाऊ-बहिणीच्या नात्यात पक्ष आडवा, माजी कृषीमंत्री गहिवरले

अमरावती शिक्षक मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : पक्ष की बहीण? भाजप नेत्यासमोर द्विधा, लढत चौरंगी

अमरावती शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; मविआ, भाजपविरोधात भाजप नेत्याची बहीणही रिंगणात

(MLC Amravati Teacher Constituency Election Result Live Update)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें