AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी पार्कवर आज नवं त्रिकुट, मुंबई अन् राजकीय वर्तुळाचं लक्ष ‘या’ कार्यक्रमाकडे

राजकारणात काहीही शक्य असतं, ही उक्ती आज अधिक ठळक होते की काय, असं म्हटलं जातंय. म्हणूनच शिवाजी पार्कवरील कार्यक्रमाकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

शिवाजी पार्कवर आज नवं त्रिकुट, मुंबई अन् राजकीय वर्तुळाचं लक्ष 'या' कार्यक्रमाकडे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2022 | 6:54 AM
Share

गिरीश गायकवाड, मुंबईः मुंबई महापालिकेचा (BMC Election) रणसंग्राम सुरु होण्याआधी महाराष्ट्र अन् मुंबईत प्रचंड राजकीय उलथापालथी सुरु आहेत. त्यातच सणासुदीत उत्सवाचा मुलामा देत काही राजकीय समीकरणंही बदलू पाहत आहेत. आज मुंबईतील शिवाजी पार्कवरचा (Shivaji Park) कार्यक्रमही याच खेळींचा भाग आहे का, हे आगामी काळात लवकरच स्पष्ट होईल. राजकीय वर्तुळाचं या कार्यक्रमाकडे जातीनं लक्ष आहे, कारण इथे प्रथमच एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र दिसणार आहेत.

मनसेच्या वतीने दीपोत्सवाची जंगी तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्कमध्ये भले मोठे कंदील लावण्यात आले आहेत. झुंबर आणि इतर लायटिंगदेखील लक्षवेधी ठरतेय. शिंदे आणि फडणवीस यांच्या हस्ते या दीपोत्सवाचे उद्घाटन होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी चार वाजेच्या सुमारास या कार्यक्रमाला येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस आहे. आजपासून मनसेच्या दीपोत्सवाची सुरुवात होणार आहे. या उत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आमंत्रित करण्यात आलंय.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला सहानुभूती दर्शवण्यासाठी राज ठाकरे यांनी शिष्टाई केली. त्यानंतर भाजपने आपल्या उमेदवाराची माघार घेतली. त्यानंतर मुंबई महापालिकेत राज ठाकरे भाजपाला साथ देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

मनसेच्या नेत्यांकडून वारंवार येणारी वक्तव्यदेखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधणारी असतात तर सध्याच्या सरकारकडे विनंती करणारी असतात. त्यामुळे शिंदे गट आणि विशेषतः भाजपच्या बाबतीत राज ठाकरेंचा सूर मवाळ होत असल्याचे दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध चांगले आहेत, हे सर्वश्रुत आहे. त्यातच दसरा मेळाव्यात जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी आमंत्रित केलं होतं. आता राज ठाकरे यांनाही शिंदे-भाजप महायुतीत एकत्र घेतलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

राजकारणात सर्व काही शक्य असतं, असं म्हटलं जातं. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीत राज ठाकरे भाजपसोबत जाण्याची एक महत्त्वाची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाची मतं फोडण्यात भाजपा यशस्वी होऊ शकेल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.