AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यापुढे मराठीचा अपमान करणाऱ्यास भर रस्त्यात थोबडवू, मनसेचा इशारा

गाणं शिकता शिकता मुलावर संस्कार करायला विसरले," असा टोलाही त्यांनी लगावला. (MNS leader Ameya Khopkar Warns Anyone who insults the Marathi language)

यापुढे मराठीचा अपमान करणाऱ्यास भर रस्त्यात थोबडवू, मनसेचा इशारा
| Updated on: Oct 28, 2020 | 12:08 PM
Share

मुंबई : “मुंबईत महाराष्ट्रात जो कोणी मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवण्यात येईल,” असा धमकीवजा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे. बिग बॉसमधील (Bigg Boss) स्पर्धकजान कुमार सानूने मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना ‘मराठी’ भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारला होता. त्याप्रकरणी ‘टीव्ही 9 मराठी’वर प्रतिक्रिया देताना अमेय खोपकरांनी हा इशारा दिला. (MNS leader Ameya Khopkar Warns Anyone who insults the Marathi language)

“यापुढे जो कुणी मुंबईत महाराष्ट्रात मराठी भाषेचा अपमान करेल त्याला विनंती, निवदेन अशी भाषा न करत थेट भर रस्त्यात थोबडवण्यात येईल. याप्रकरणी कोणाला आमच्यावर काय कारवाई करायची ते करा,” असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

“बिग बॉस या शोला काही टीआरपी नाही किंवा हा शो कोणी जास्त बघत नाही. त्यामुळे काही खुसपट काढायची आणि त्या माध्यामातून कशाप्रकारे प्रसिद्धी मिळेल अशा गोष्टी करुन घ्यायच्या. हे चॅनलला एडिट करता आलं असतं. पण हे मुद्दाम केलं आहे. जेणेकरुन त्यांची एक बातमी होईल आणि त्याचे प्रोमो चालतील. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मराठी भाषेचा मुंबईत महाराष्ट्रात येऊन अपमान कराल,” असेही अमेय खोपकर म्हणाले.

“कुमार सानू हे ज्येष्ठ गायक, संगीतकार आहे. त्यांचा मी नक्की आदर करतो. पण ते गाणं शिकता शिकता मुलावर संस्कार करायला विसरले,” असा टोलाही त्यांनी लगावला.

“पण कुमार सानू यांचा मुलगा याचं काय करायचं, याला कशी मराठीची चिड येते, ते त्याला नक्की दाखवू. पण जर 24 तासाच्या आत बिग बॉसने किंवा कलर्सने माफी मागितली नाही, तर बिग बॉसचं गोरेगावमधील शूटींग होऊ देणार नाही, याला धमकी किंवा इशारा काय समजायचे ते समजा. पण त्या सेटचं काय होईल, याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यायची,” असेही अमेय खोपकर म्हणाले.

“मुंबईत राहून मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. तुमच्या टीआरपीसाठी मराठी भाषेचा अपमान करायचा नाही. मला पत्र लिहून माफी न मागता बिग बॉसच्या शोमध्ये माफी मागा तर मुंबईत बिग बॉसचे शूटींग होणार नाही,” असेही अमेय खोपकरांनी सांगितले.

बिग-बॉसमध्ये नेमकं काय घडलं? 

बिग बॉस’च्या घरात मराठमोळा गायक राहुल वैद्य स्पर्धक म्हणून सामील झाला आहे. या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणाने या दोघांमध्ये बिनसल्याने निक्कीने जानची साथ सोडत, राहुल वैद्यचा हात धरला आहे.

राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला, ‘माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल’, असे म्हंटले. तसेच, मला मराठी ऐकून चीड येते, असे तो म्हणाला. (MNS leader Ameya Khopkar Warns Anyone who insults the Marathi language)

संबंधित बातम्या : 

‘मुंबईत राहून तुझ करिअर कसं बनतं तेच बघतो..’ अमेय खोपकरांचा ‘बिग बॉस’ स्पर्धकाला इशारा!

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नेपोटिझमचे वादळ, राहुल वैद्य-जान कुमार सानूमध्ये खडाजंगी!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.