आर.आर. पाटील अशावेळी तात्काळ कारवाई करायचे; सचिन वाझे प्रकरणात मनसेच्या नेत्याची प्रतिक्रिया

सचिन वाझे यांनी राजीनामा देऊन सत्याचा स्वीकार करायला पाहिजे. | Bala Nandgaonkar Sachin Waze

आर.आर. पाटील अशावेळी तात्काळ कारवाई करायचे; सचिन वाझे प्रकरणात मनसेच्या नेत्याची प्रतिक्रिया
सचिन वाझे यांनी राजीनामा देऊन सत्याचा स्वीकार करायला पाहिजे, असा सल्ला दिला. या कारणावरून सभागृहाचे कामकाज बंद पाडणे योग्य नाही.

मुंबई: सध्या विधानसभेत गाजत असलेल्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावरुन आता ‘मनसे’नेही राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या चुका लक्षात आणणं हे विरोधकांचे काम आहे. आर.आर. पाटील (R R Patil) हे जर आमचं म्हणणं योग्य असेल तर संबंधितांवर ताबडतोब कारवाई करायचे, अशी आठवण बाळा नांदगावकर यांनी सांगितली. (R R patil was taking action immediately if opposition party’s accusations are right says MNS leader Bala Nandgaonkar)

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सचिन वाझे यांनी राजीनामा देऊन सत्याचा स्वीकार करायला पाहिजे, असा सल्ला दिला. या कारणावरून सभागृहाचे कामकाज बंद पाडणे योग्य नाही. विधानसभेत केवळ मुकेश अंबानी आणि सचिन वाझे यांच्यावर चर्चा होते. लोकहिताच्या प्रश्नांवर काम होत नाही, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली.

‘अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा तपास एकाच यंत्रणेने करावा’

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीन सापडले असेल तर त्याचा तपास निपक्ष:पातीपणे व्हायला हवा. हा तपास एकाच यंत्रणेकडून झाला पाहिजे, असे मत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.

ठाकरे सरकार पुन्हा बॅकफुटवर, वाझेंना क्राईम ब्रॅचमधून हटवलं

हिरेन मनुसख प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे (Sachin Waze) यांना गुन्हे शाखेतून (Crime Branch) हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वझे यांना हिरेन मनसुख प्रकरणाच्या तपासावरून आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

मनसुख हिरेन प्रकरणात विमल हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार तपास सुरु आहे. विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असतील तर त्यांनी एटीएसकडे द्यावेत. एटीएस याबाबत कोणालाही पाठिशी घालणार नाही. सचिन वझे किंवा कोणाचाही जावई असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले.

मात्र, अनिल देशमुख यांच्या या घोषणेनंतर भाजप आमदार प्रविण दरेकर आणि भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घालायला सुरुवात केली. आम्ही फक्त सचिन वाझेंच्या बदलीवर समाधानी नाही. त्यांना तात्काळ अटक झालीच पाहिजे. अन्यथा आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.

संबंधित बातम्या:

अधिवेशनाची सुरुवात राजीनाम्याने, शेवट बदलीने, देवेंद्र फडणवीसांच्या आक्रमकतेला अभ्यासाची जोड

वकिलीबाणा, आक्रमकता, प्रशासनावर पकड, फडणवीसांनी एकहाती अधिवेशन गाजवलं; सत्ताधाऱ्यांचा पुअर शो!

सचिन वाझे प्रकरणामुळे शरद पवार नाराज; दिल्लीहून तातडीने निघाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार

(R R patil was taking action immediately if opposition party’s accusations are right says MNS leader Bala Nandgaonkar)

Published On - 2:33 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI