AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य शिरोडकरांच्या ‘खुर्ची’वर अमित ठाकरेंना बसवा, मनविसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडे मागणी

राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी आणि मनविसेच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली.

आदित्य शिरोडकरांच्या 'खुर्ची'वर अमित ठाकरेंना बसवा, मनविसेच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरेंकडे मागणी
Aditya Shirodkar, Amit Thackeray, Raj Thackeray
| Edited By: | Updated on: Jul 24, 2021 | 12:49 PM
Share

मुंबई : आदित्य शिरोडकर (Aditya Shirodkar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. शिरोडकरांच्या एक्झिटमुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना मनविसेचे अध्यक्ष करा, अशी मागणी जोर धरत आहे.

शेकडो कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी आणि मनविसेच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली. अमित ठाकरे यांना विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद द्यावं यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शंभर ते सव्वाशे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘कृष्णकुंज’वर कोण कोण?

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पानसांगे, उपाध्यक्ष नितेश खाडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना निवेदन सादर केलं.

मनविसेच्या स्थापनेपासून आदित्य शिरोडकरांकडे अध्यक्षपद

9 मार्च 2006 मध्ये मनसेची स्थापना झाली. त्यावेळी आदित्य शिरोडकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली होती. राज्यभरातील विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करुन एकजूट करण्यास सुरुवात केली होती, असं आदित्य शिरोडकर यांनी  मनसे सोडल्यानंतर सांगितलं होतं.

आदित्य शिरोडकर यांचा राजकीय प्रवास कसा?

आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना आदित्य शिरोडकर म्हणाले होते, “2009 मध्ये जेव्हा नितीन सरदेसाई यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याची संधी दिली गेली. प्रथम मला विचारले गेले परंतु माझ्या वयामुळे मी पात्र नव्हतो (ही निवडणूक अगदी जवळून हाताळली). 2012 मध्ये पुणे कॉर्पोरेशनमध्ये 29 नगरसेवक निवडून आले, तेव्हा मी वडिलांसोबत याचा एक भाग होतो. संपूर्ण महाराष्ट्रात 2014 मध्ये शिक्षण परिषद घेतली. त्यात सध्याची शिक्षण व्यवस्था कशी जुनी झाली आहे आणि सध्याच्या परिस्थितीत तरूणांना तोंड देण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत या विषयावर होती. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या ताज्या धोरणात आम्ही केलेल्या 45 टक्के संशोधनांचा समावेश आहे.”

संबंधित बातम्या :

मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

Amit Thackeray | ‘राज’पुत्राच्या राजकीय कारकीर्दीची वर्षपूर्ती, बीएमसीच्या कसोटीसाठी अमित ठाकरे सज्ज

(MNS leaders reach Krishnakunj demands Raj Thackeray to make son Amit Thackeray Maharashtra Navnirman Vidyarthi Sena chief)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.