AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात भाजपविरोधातील मोर्चाचे नेतृत्त्व राज ठाकरे करणार?

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात मनसे आणि भाजप या पक्षांमधील वाद चांगलाच पेटलेला दिसतो आहे. काल ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक या अंतर्गत मनसेतर्फे आंब्याचा एक स्टॉल लावण्यात आला होता.  मात्र हा स्टॉल अनधिकृत असून तो लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली. या कारणामुळे मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. […]

ठाण्यात भाजपविरोधातील मोर्चाचे नेतृत्त्व राज ठाकरे करणार?
| Updated on: Jul 05, 2019 | 3:46 PM
Share

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात मनसे आणि भाजप या पक्षांमधील वाद चांगलाच पेटलेला दिसतो आहे. काल ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक या अंतर्गत मनसेतर्फे आंब्याचा एक स्टॉल लावण्यात आला होता.  मात्र हा स्टॉल अनधिकृत असून तो लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेकडे केली. या कारणामुळे मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या राड्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत येत्या 17 मे ला ठाण्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्च्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील मुंबई, ठाणे, रायगड या ठिकाणच्या लोकसभा जागांवरील मतदान पार पडलं. मतदानानंतर सर्वत्र राजकीय वातावरण शांत असताना ठाण्यात काल अचानक मनसे आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

नेमकं प्रकरण काय ? 

ठाण्यातील नौपाडा येथे शेतकरी ते ग्राहक या कार्यक्रमातंर्गत मनसेतर्फे एका शेतकऱ्याने रस्त्यावर आंब्याचा स्टॉल लावला होता. मात्र हा स्टॉल अनधिकृत असून यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. त्यामुळे हा आंब्याचा स्टॉल लवकरात लवकर हटवा अशी मागणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केली. मात्र या स्टॉलच्या शेजारी असलेल्या अनधिकृत गाळा आधी हटवा, नंतर आम्ही आंब्याचा स्टॉल हटवतो अशी भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. यानंतर भाजपने मनसेच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत राज ठाकरे हाय हायच्या घोषणा दिला. तर मनसेच्या कार्यकर्त्यांनीही चौकीदार चोर हे अस म्हणतं भाजपविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकरणानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

काल ठाण्यातील नौपाडा येथे घडलेल्या संपूर्ण प्रकारानंतर ठाणे महापालिकेतर्फे मनसेच्या आंबा स्टॉलला परवानगी नाकरण्यात आली आहे. तसेच या स्टॉलवरील शेतकऱ्याला नोटीसही पाठवण्यात आली आहे. आंबा विक्रेत्या शेतकऱ्याला पाठवलेल्या नोटीसीवरुन मनसेतर्फे ठाणे महापालिका प्रशासन आणि भाजपा विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या 17 मे रोजी या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्च्यात ठाण्यातील शेतकरी आंबा विक्रेते आणि मनसे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. तसंच या मोर्च्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार असल्याची शक्यता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या