मनसे रोख स्वरुपात कितीही देणगी घ्यायला तयार : राज ठाकरे

मनसे रोख स्वरुपात कितीही देणगी घ्यायला तयार : राज ठाकरे


मुंबई : इलेक्टोरल बाँडवर मनसेही पैसे घेईल, पक्ष चालवायचाय. पक्ष जेव्हा चालवावे लागतात तर पैसेही लागतात. पक्षासाठी रोख स्वरुपात कितीही देणगी घेण्यासाठी तयार आहे, शिवाय देणगीदाराचं नाव जाहीर करणार नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. शिवाय भाजपकडून एवढा पैसा येतो कुठून? असा सवालही त्यांनी केला. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते.

राजकीय पक्ष सध्या इलेक्टोरल बाँडवर पैसे घेत आहेत, ज्याविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. यावर सुप्रिम कोर्टाने निर्णय राखीव ठेवला आहे. राजकीय पक्षांसाठी 20 हजार रुपयांची देणगी रोख स्वरुपात घेता येऊ शकते. त्यासाठी देणगीदाराचं नाव जाहीर करण्याची गरज नाही. पण यापुढील रकमेसाठी रोखीने व्यवहार करता येणार नाही. यासाठी मोदी सरकारने 2017 मध्ये कायद्यात संशोधनही केलं होतं.

VIDEO : राज ठाकरे काय म्हणाले?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI