आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं : अबू आझमी

अबू आझमींनी CAA आणि NRC कायद्यावरुन मोदींवर टोकाची टीका केली. मोदींवर टीका करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Abu Azmi attack Narendra Modi, आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं : अबू आझमी

ठाणे : मुंबईतील मानखुर्दचे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर (Abu Azmi attack Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. अबू आझमींनी CAA आणि NRC कायद्यावरुन मोदींवर टोकाची टीका केली. मोदींवर टीका करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं”, असं अबू आझमी (Abu Azmi attack Narendra Modi) म्हणाले. ठाण्यातील मुंब्रा इथं सुधारित नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी अबू आझमी बोलत होते.

अबू आझमी म्हणाले, “आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं. तुमची आई कुठे जन्मली ते सर्टिफिकेट दाखवा. ज्या खासदारांनी हा कायदा संमत केला, त्यांनी आपल्या आई-वडिलांचं सर्टिफिकेट दाखवावं”, असं आव्हान अबू आझमींनी दिलं.

“देशावर आपत्ती आली आहे. संविधानासमोर मोदी लहान आहेत. ज्यांनी संविधान बनवले त्यांचे संविधान बदलण्याचे काम या मोदी सरकारने केले आहे”, असा आरोप अबू आझमींनी केला.

अमित शाहांवर टीकास्त्र

“मोदीजी तुम्ही खूप लहान आहात. तुम्ही ज्या माणसाने बनवलेलं संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहात, त्या माणसाकडे 35 पदव्या होत्या. तुम्ही एक चहावाले होता. तुमच्यासोबत जो दुसरा माणूस आहे (अमित शाह), या देशाचं दुर्दैव आहे की, ज्या खुर्चीवर सरदार वल्लभभाई पटेल बसले होते, आज त्या खुर्चीवर ज्याला गुजरातच्या जेलमध्ये ठेवलं होतं, ज्याला तडीपार केलं होतं, तो बसला आहे” असं अबू आझमी म्हणाले.

इंग्रजांचे तळवे चाटले

आज तुम्ही ज्या लोकांना आव्हान दिलं आहे, ते त्या कुटुंबातील आहेत ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले जीव दिले. मात्र तुम्ही त्या परिवारातील आहात, ज्यांनी इंग्रजांचे तळवे चाटले, असं म्हणत अबू आझमींनी संघावर निशाणा साधला.

यांच्या माणसांना जेव्हा जेलमध्ये टाकलं तेव्हा त्यांनी जेलमधून इंग्रज अधिकाऱ्यांना पत्र लिहून, आम्हाला जेलमधून सोडा, आम्ही गांधीजींच्या स्वदेशी आंदोलनाला मातीमोल करु असं म्हणाले होते. हे इंग्रजांचे दलाल आज आमच्याकडे सर्टिफिकेट मागत आहेत.

आमच्याकडे सर्टिफिकेट मागण्यापूर्वी सर्वात आधी मोदींनी स्वत:च्या आईचं सर्टिफिकेट आणावं. तुमची आई कुठे जन्मली ते सर्टिफिकेट दाखवा. ज्या खासदारांनी हा कायदा संमत केला, त्यांनी आपल्या आई-वडिलांचं सर्टिफिकेट दाखवावं, असं आव्हान अबू आझमींनी दिलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *