विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता

एक महत्वाची माहिती सूत्रांकडून मिळतेय. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जातेय.

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता
विधानभवन
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 3:44 PM

मुंबई : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पावसाळी अधिवेशनातच घ्यावी अशी मागणी सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसनं लावून धरली आहे. तसंच भाजपकडूनही विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी होतेय. अशावेळी एक महत्वाची माहिती सूत्रांकडून मिळतेय. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जातेय. (special session is likely to be convened for the Assembly Speaker election)

विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षपद निवडणुकीसाठी सकारात्मक आहेत. नागपूरमध्ये पार पडणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा अध्यक्ष कोण होणार?

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष कोण होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रीपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.

‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही’

देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनापूर्वीच विधानसभा अध्यक्षपदाची निवड इतक्यात होणार नाही, असे म्हटले होते. तुमच्याकडे बहुमत आहे तर एवढं महत्त्वाचं पद रिकामं का ठेवत आहात? ते भरत का नाही? असा सवाल करतानाच आता जी परिस्थिती दिसते, त्यात काही बदल झाला नसेल तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले होते.

विधानसभा अध्यक्षांचं काम काय?

विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत व्यापक अधिकार आहेत.

विधानसभा अध्यक्षांची निवड सदस्यांद्वारे मतदान प्रक्रियेद्वारे होते. सत्ताधारी आणि विरोधीपक्षाकडून उमेदवार विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतात.

सदनाच्या आवारात विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च अधिकार असतात. विधानसभेची व्यवस्था टिकवून ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे आणि विधानसभेतील सदस्यांनी नियमांचे पालन केले आहे, की नाही, यावर ते देखरेख करतात.

सभागृहातील सर्व सदस्यांनी विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आदरपूर्वक ऐकणं अपेक्षित असतं. ते सभागृहाच्या चर्चेत सहभाग घेत नाहीत, परंतु ते विधानसभेच्या कामकाजादरम्यान आपला निर्णय देतात. विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष कामकाज पाहतात.

सभागृहातील एखाद्या सदस्याला आमदारकीचा राजीनामा द्यायचा असेल, तर तो विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द (Assembly Speaker Rights) करतो.

संबंधित बातम्या :

माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप, गुन्हा केला असेल तर शिक्षेला तयार, केला नसेल तर सरकारने क्लीनचिट द्यावी : सरनाईक

भाजपच्या प्रति विधानसभेला भास्कर जाधवांचा आक्षेप, नियम दाखवत म्हणाले, ‘त्यांचा स्पीकर जप्त करा’

special session is likely to be convened for the Assembly Speaker election

Non Stop LIVE Update
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.